राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून...
मुंबई : राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यांनाच आता बाईक-टॅक्सी चालवता येईल. याशिवाय, बाईक-टॅक्सी चालवणाऱ्यांना मराठी भाषा येणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची ओळख, कागदपत्रांची पडताळणी निश्चित करण्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.
या अनुषंगाने, बाईकटॅक्सी तसेच प्रवासी चारचाकी चालकांसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आणि त्यानंतरच अधिकृत बॅज देण्याची व्यवस्था लागू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
रोजगाराच्या संधी वाढतील
राज्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढत आहे. परप्रांतातून अनेकजण महाराष्ट्रात येतात. बाईक खरेदी करतात आणि थेट वाहतुकीचा व्यवसाय सुरू करतात. हा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र असेल, त्यांनाच वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाने स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी वाढतील आणि शासनाच्या महसुलातही भर पडेल.
– प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र
इथेनॉलचा निर्णय मागे पडणार
वाहन मालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिसळण्याचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात E20 बाबत सुरू असलेल्या चर्चेच्या आणि वाहनधारकांकडून सुरु असलेला विरोध त्याचबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्राकडून सुरु असलेल्या तक्रारी येतच होत्या. विविध व्हिडीओ व्हायरल होत होते. त्यामुळे, केंद्र सरकार सध्या E25, म्हणजेच २५% इथेनॉल असलेले पेट्रोल, लागू करण्याची घाई करत नसल्याचं समोर येत आहे.
‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा






