Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार; मुंबईतील सभेत शरद पवारांचं मोठं आश्वासन

महाविकास आघाडीच्या मुंबईतील स्वाभिमान सभेत शरद पवारांकडून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले आहे. या आश्वासनामध्ये शेतकऱ्यांचे 3 लाखाांपर्यंत कर्ज माफ केले जाणार तर त्यांना प्रोत्साहन रक्कम ही दिली जाणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 06, 2024 | 09:38 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महाविकास आघाडीकडून आज मुंबई महाराष्ट्र स्वाभिमान सभेद्वारे प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. या स्वाभिमान सभेत बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून सरकार आल्यानंतर कृषी सन्मान योजना राबविण्यात येईल त्याबद्दल माहिती दिली, या योजनेद्वारे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल आणि जो शेतकरी नेहमी कर्ज भरतो त्याला 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सद्यस्थितीवरही कटाक्ष टाकताना त्यांनी महायुती सरकारवरही जोरदार निशाणा साधला.

हे देखील वाचा- उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली: धारावीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका; म्हणाले, “आमचे सरकार आल्यास…”

महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर भाष्य

महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीवर बोलताना शरद पवार म्हणाले की,  महाराष्ट्र क्रमाक 1 चे राज्य होते, भाजप आणि त्यांच्या मित्रांच्या हातात सत्ता गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचा क्रमांक 6 वर घसरलेला आहे. एकेकाळी कायदे आणि सुव्यवस्थेची मोलाची कामगिरी करणारे राज्य होत आज   स्त्री अत्याचार वाढले. राज्यामध्ये 64 हजार महिला आणि मुली बेपत्ता आहेत ही स्थिती कधीच नव्हती. महाराष्ट्र हे शिक्षणासंबंधी नेहमी प्रगत राज्य होते. आज शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र घसरला आहे.

सिंधुदुर्गातील पुतळ्यात भ्रष्टाचाराचा विक्रम

ते पुढे म्हणाले की, शिवछत्रपती हे देशाचे स्वाभिमानाचे प्रतिक, हल्लीच्या काळात भ्रष्टाचार हा कोणत्या टोकाला गेला हे सांगायचे असेल तर एकच उदाहरण सांगतो की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवछत्रपतींचा पुतळा जो उभा केला. त्या उभारणीतही भ्रष्टाचार झाला.गेट वे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. समोर समुद्र असूनही त्या पुतळ्याला काहीही झाले नाही. पण सिंधुदुर्गतील पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण झाले तो पुतळा उद्धवस्त होतो आणि सरकारकडून सांगितले जाते की, समुद्राचा वाऱ्याने पुतळा उद्धवस्त झाला. मुंबईतील पुतळे वाऱ्याने उद्धवस्त होत नाही याचे कारण तिथे भ्रष्टाचार नव्हता. सिंधुदुर्गातील पुतळ्यात भ्रष्टाचाराचा विक्रम या सरकारने केले त्यामुळेच शिवछत्रपतींचा अपमान झाला.

शेतकरी कर्जाची माहिती देताना शरद पवार यांनी सांगितले की पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कृषीमंत्री असताना 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले. व्याजाचा दरही 3 टक्क्यांवर आणला.

पंचसुत्री योजनेतील इतर आश्वासने

या स्वाभिमान सभेद्वारे महाविकास आघाडीने शक्तीप्रदर्शन करत कृषी सन्मान योजनेसोबतच पंचसुत्री योजनेतील इतर योजनाही जाहीर केल्या त्यामध्ये  युवकांना प्रतिमहिना ४ हजार रुपये दिले जाणार,  कुटूंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा व मोफत औषधे दिला जाणार, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास उपलब्ध केला जाणार जातनिहाय जनगणना करणार व 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील असणार ही आश्वासने दिली गेली.

Web Title: Big announcement for farmers by sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 08:46 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
1

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
2

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
3

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
4

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.