Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट; नवी मुंबईतील युट्युबर विरोधात गुन्हा दाखल

दलित समाज आणि डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल एका यूट्यूबरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नवी मुंबई येथील आहे. ओम यादव असं युट्यूबरचे नाव आहे. ज्याने युट्यूबला अश्या पध्दतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 01, 2024 | 01:08 PM
दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट; नवी मुंबईतील युट्युबर विरोधात गुन्हा दाखल (फोटो सैजन्य - pinterest)

दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट; नवी मुंबईतील युट्युबर विरोधात गुन्हा दाखल (फोटो सैजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबईतील एका युट्युबरला पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरातील ही घटना आहे. ओम यादव असं या युट्युबरच नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- इमारतीत जाण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण; जिम ट्रेनरला अटक, मुंबईतील घटना

ओम यादवने सोशल मिडीया प्लॅटफॉर्म युट्यूबवर दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ सुमारे 90 सेकंदाचा होता. या व्हिडीओमध्ये काही अपशब्द वापरण्यात आले आहेत, ज्यामुळे जातींमध्ये तेढ निर्माण होऊन वाद होण्याची शक्यता होती. तसेच या व्हिडीओमध्ये दलित समाजाला अमानुष वागणूक आणि अस्पृश्यतेच्या प्रथेच्या संदर्भात अपशब्द वापरण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये युट्यूबर ओम यादव याने कायदा आणि सुव्यस्थेला देखील आव्हान दिल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर घणसोली येखील रहिवासी विक्रांत चिकणे यांनी युट्यूबर ओम यादव विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी युट्यूबर ओम यादव विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील युट्युबर ओम यादव याने त्याच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ 90 सेकंदाचा असून व्हिडीओमध्ये दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करण्यात आलं आहे. तसेच त्याने कायदा सुव्यस्थेला देखील आव्हान दिलं आहे.

हेदेखील वाचा- मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पुढील आदेशापर्यंत राहणार बंद! काय आहे कारण, वाचा

पोलिसांनी पुढे सांगितलं की, व्हिडीओमध्ये दलित समाजाला अमानुष वागणूक आणि अस्पृश्यतेच्या प्रथेच्या संदर्भात अपशब्द वापरण्यात आले आहेत. या प्रकरणी घणसोली येखील रहिवासी विक्रांत चिकणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार युट्यूबर ओम यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास वाशीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त योगेश गावडे करणार आहेत. आम्ही YouTube ला व्हिडिओ काढून टाकण्यासाठी निर्देशित करू. आम्ही अद्याप कंटेंट क्रिएटरचा शोध घेऊ शकलो नाही. त्याचा शोध सुरु आहे.

तक्रारदार विक्रांत चिकणे यांनी सांगितलं की, ओम याचे युट्यूब चॅनेलवर 1,89,000 सबस्क्राइबर्स आहेत. युट्यूबरचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रसारित केला होता. मला हा व्हिडीओ माझ्या मित्राने शेअर केला. व्हिडिओतील मजकूर पाहून मी पूर्णपणे हादरलो. त्यांनी केवळ समुदायांमध्ये शत्रुत्व आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान नेत्याबद्दल अत्यंत निंदनीय भाषा वापरली आहे. अस्पृश्यता सारख्या वाईट प्रथांचे समर्थन करणे अक्षम्य आहे आणि गंभीर कारवाई करणं आवश्यक आहे.

Web Title: Case has been filed against youtuber due to post offensive videos against dalit society and dr babasaheb ambedkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 01:08 PM

Topics:  

  • dr babasaheb amdekar
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

नवी मुंबईतील महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प; उलवे कोस्टल रोड २०२६ पर्यंत सेवेत येणार?
1

नवी मुंबईतील महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प; उलवे कोस्टल रोड २०२६ पर्यंत सेवेत येणार?

Navi Mumbai News : अतिक्रमणचा पदभार सुटेना; महानगरपालिका आयुक्त झाले हतबल
2

Navi Mumbai News : अतिक्रमणचा पदभार सुटेना; महानगरपालिका आयुक्त झाले हतबल

मुंबईत काळ्या जादूचा विचित्र प्रकार; पत्नी आणि सासूला केलं निर्वस्त्र; काढले फोटो अन् मग…,
3

मुंबईत काळ्या जादूचा विचित्र प्रकार; पत्नी आणि सासूला केलं निर्वस्त्र; काढले फोटो अन् मग…,

लाख रुपये खर्च करून देखील सिवूडस येथील पाळणाघर बंद, माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी महापालिकेला धरले धारेवर
4

लाख रुपये खर्च करून देखील सिवूडस येथील पाळणाघर बंद, माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी महापालिकेला धरले धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.