४.२५ कोटी गुंतवणूक, अपहार १७७ कोटींचा; टोरेसप्रकरणी आरोपपत्र दाखल
टोरेस गैरव्यवहारात राज्यातील १४ हजार १५७ गुंतवणूकदारांची फसवणूक करून १७७ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या फरार युक्रेनियन आरोपींनी यासाठी चार कोटी ३५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात उघड झाले आहे. त्यासाठी दोन बनावट कंपन्यांचा वापर करण्यात आला असून, त्यांच्या माध्यमातून कूट चलन भारतात हस्तांतरित करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
Crime News: नारायणगावमध्ये पत्रकारावर भ्याड हल्ला; वृत्त संकलनासाठी गेला अन्…, नेमके प्रकरण काय?
या प्रकरणातील संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको ऊर्फ अॅलेक्स, ओलेक्झांड्रा बुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेको यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. आरोपी लल्लन जमेदार सिंह याच्या अॅस्ट्रोझेन फार्मा प्रा.लि. आणि प्रीसाह अॅडवायजरी प्रा. लि. या कंपन्यांमार्फत या गैरव्यवहाराचा मूळ असलेल्या प्लाटिनम हेर्न प्रा.लि. या कंपनीत अनुक्रमे ४५ लाख आणि ३ कोटी ९० लाख रुपये अशी एकूण ४ कोटी ३५ लाख रुपयांची गुंतणूक करण्यात आली, अशी माहिती ईडीच्या तपासात समोर आली. त्याबाबत प्रकरणातील मुख्य आरोपी ओलेक्झांडर झापिर्चेको ऊर्फ अॅलेक्स याने दिलेल्या रोख रकमेच्या बदल्यात ही गुंतवणूक करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.
साखरपुड्यासाठी गेलेल्या चुलता-पुतण्यावर काळाचा घाला; भीषण अपघातात मृत्यू
अलेक्सकडून आलेले कूट चलन लल्लन जमेदार सिंहने भारतीय चलनात रुपांतरीत करण्यास मदत केली. ती रक्कम टोरेसच्या सर्व अधिकृत व्यवहारांसाठी वापरण्यात आली. ईडीच्या आरोपपत्रात सनदी लेखापाल अभिषेक गुप्ता यांनाही आरोपी करण्यात आलं आहे. हा गैरव्यवहार गुप्ता यांनी उघड केल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यामुळे दोन यंत्रणांमधील परस्पर विरोधी दावे दाखल करण्यात आले आहेत.