
मंत्री लोढांना धमकी देणारे अस्लम शेख अडचणीत (Photo Credit - X)
‘कुटुंबाला संपवण्याची’ जाहीर धमकी
मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीला खतपाणी घालत असून देशाच्या सुरक्षेशी खेळत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. यावर सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा करून त्या भागात अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. याचा राग मनात धरून शेख यांनी मंत्री लोढा यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला संपवण्याची जाहीररीत्या भाषा केली आहे. या धमकीच्या संदर्भात लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील केली आहे. आता याचे पडसाद उमटत असून स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहे. हा लढा अधिक तीव्र होताना दिसत असून स्थानिकांनी शेख यांचे बॅनर फाडून आपला रोष व्यक्त केला. स्थानिकांसह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले.
भाजप नेत्यांचा आक्रमक पवित्रा
स्थानिकांच्या आंदोलनात भाजप नेते आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर , मनीषा चौधरी आणि संजय उपाध्याय देखील या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी संजय उपाध्याय म्हणाले की, राज्याच्या मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला एखादा आमदार जीव मारण्याची धमकी देतो हे अतिशय गंभीर आहे. याचा आम्ही कायद्याचे पालन करून विरोध करत आहोत, पण शेख यांना समजेल अशा भाषेत देखील आम्ही उत्तर देऊ शकतो. तर बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, जे या घुसखोरांना पाटबळ देत आहेत, त्यांच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे.
भाजप विरुद्ध काँग्रेस असा हा संघर्ष नाही तर….
आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी आम्ही मालवणी पोलीस ठाण्यात देखील ठिय्या दिला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासन कारवाई करेल असेही, आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले. हा केवळ भाजप विरुद्ध काँग्रेस असा हा संघर्ष नाही तर, देशाच्या सुरक्षेसंदर्भात जनता विरुद्ध काँग्रेस असा हा संघर्ष असल्याचे आमदार श्री. अतुल भातखळकर यावेळी म्हणाले. या आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्यासह सकल हिंदु समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
हे देखील वाचा: “राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून…”; काय म्हणाले मंत्री Managl Prabhat Lodha?