मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अमित साटम यांनी शुक्रवारी सकाळी छट पूजा आयोजित होणाऱ्या पूजा स्थळांचा पाहणी दौरा केला. यादरम्यान त्यांनी महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत असमाधान व्यक्त केले.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव येथील प. दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार पार पडला. यावेळी नागरिकांच्या समस्या लोढा यांनी समजून घेतल्या.
मुंबई परिसरात रात्री उशिरा छटपूजेकरिता मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात, अशावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी छट पूजा समित्यांच्या प्रतिनिधींनी केली होती.
कार्तिक शुक्ल चतुर्थीला छठपूजा हा सण सुरू होऊन कार्तिक शुक्ल सप्तमीला सूर्याला अर्ध्य वाहून सणाची सांगता होते. या चार दिवसाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक विविध पूजेसाठी घराबाहेर पडतात.
मुंबईच्या ऐतिहासिक दागिने बाजाराचे वैभव, परंपरा आणि आर्थिक महत्त्व पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रथमच 'झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिव्हल 2025' चे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील युवकांना रोजगार संदर्भात शिक्षण देणे या उद्देशाने राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ राबवले जाणार आहेत. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे हा उपक्रम राबवला जाणार आहे.
भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्सुर्फ सहभागाने झाला पाहिजे. त्यामुळेच या महोत्सवासाठी जनतेच्या सहभागातून बोधचिन्हाचे निवड करण्यात आली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानातील नवीन व्यवसायांमध्ये महाराष्ट्राला आघाडीवर नेण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून ‘टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ च्या स्वप्नाला साकार करू या.
भारत स्वच्छ करण्याचा निर्धार आदरणीय पंतप्रधानांनी केला असून, त्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
दादर येथील कबुतरखाना बंद केल्यानंतर नवीन कबुतरखाना सुरु होणार का? असे प्रश्न विचारले जात होते. अशातच मुंबईतील नॅशनल पार्क येथे नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याहस्ते करण्यात आले.
मुंबई महापालिका क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसेच म्हाडा आणि एसआरएच्या नियमावलीनुसार बांधकाम झालेल्या काही इमारतींना अद्याप अंतिम भोगवटा प्रमाणपत्र अर्थात OC मिळालेली नाही.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्सुर्फ सहभागाने झाला पाहिजे, असे मंत्री लोढा म्हणाले आहेत.
रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करत जर सर्व बाबींचे अनुपालन व्यवस्थित झाले असेल तर ओसी देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते.
गणपती चतुर्थीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविण्यात येत आहे.अशातच आता गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष 'नमो एक्सप्रेस' रवाना करण्यात आली.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत सदर शाळेच्या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे.
मागील ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशात विकास कार्याला महत्व देऊन मोठ्या गतीने देशाचा विकास केला आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा गोंदियात म्हणाले.
राज्यातील एका हजार आयटीआयमध्ये आज ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना काही महत्वपूर्ण आवाहन केले.