Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-सायप्रस मैत्री होणार अधिक मजबूत, सायप्रसच्या राष्ट्र्पतींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा

मुंबईत आयोजित 'सायप्रस इंडिया बिझनेस फोरम' या कार्यक्रमात आज (गुरुवार, २१ मे) सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 21, 2026 | 06:32 PM
CM Devendra Fadnavis meet Cyprus President Nikos Christodoulides in Cyprus India Business Forum, Cyprus India Business Forum, India Cyprus Friendship,

CM Devendra Fadnavis meet Cyprus President Nikos Christodoulides in Cyprus India Business Forum, Cyprus India Business Forum, India Cyprus Friendship,

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईत आयोजित ‘सायप्रस इंडिया बिझनेस फोरम’ या कार्यक्रमात सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
  • महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध – मुख्यमंत्री फडणवीस
  • आर्थिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबईत आयोजित ‘सायप्रस इंडिया बिझनेस फोरम’ या कार्यक्रमात आज (गुरुवार, २१ मे) सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. सायप्रसच्या उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी, तसेच उत्पादन, नवोपक्रम आणि व्यापार क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी निर्माण करावी. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भारत आणि सायप्रस यांचे संबंध लोकशाही, सार्वभौमत्व आणि शांततामय सहअस्तित्व या समान मूल्यांवर आधारित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये केलेल्या सायप्रस दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळाले असून आर्थिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.”

“महाराष्ट्र हे आज $660 अब्ज अर्थव्यवस्थेचे राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. मुंबई हे जगातील वेगाने विकसित होणारे आर्थिक केंद्र बनत असून राज्यात अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो नेटवर्क, लॉजिस्टिक पार्क आणि स्मार्ट शहरांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून निर्माण होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय एज्यु सिटी, मेडी सिटी आणि जीसीसी सिटीसारखे जागतिक दर्जाचे प्रकल्पही उभारले जात आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, “सायप्रस हे युरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्यपूर्वेसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा आणि नवोपक्रम क्षेत्रात सायप्रसची मोठी ताकद असून महाराष्ट्र आणि भारत हे जागतिक आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरेल. फिनटेक आणि डिजिटल व्यवहार क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर आदर्श निर्माण केला असून भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे अब्जावधी व्यवहार सुरक्षितपणे होत आहेत. सायप्रसच्या युरोपीय वित्तीय नेटवर्क आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील सहकार्यामुळे सीमापार वित्तीय व्यवहार आणि डिजिटल नवोपक्रमासाठी नवे मार्ग खुले होतील.”

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?

“कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, संशोधन, शिक्षण आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्रात येणारे जागतिक गुंतवणूकदार हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यात गुंतवणूक करत आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंध आशादायी असून भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागर हे व्यापार, तंत्रज्ञान आणि सामरिक सहकार्याद्वारे अधिक जवळ येत आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (CCCI)चे अध्यक्ष स्टावरोस स्टावरू, इन्व्हेस्ट सायप्रसचे अध्यक्ष एव्हजेनिओस एव्हजेनिओ, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)चे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा द सन्मार ग्रुपचे अध्यक्ष विजय शंकर, सीआयआयच्या राष्ट्रीय कौशल्य आणि उपजीविका समितीचे अध्यक्ष तथा ब्ल्यू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांमध्ये व्यापक सोशल इंजिनिअरिंग; समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व

Web Title: Cm devendra fadanavis meet cyprus president nikos christodoulides in cyprus india business forum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली तारीख
1

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली तारीख

Devendra Fadnavis : सायप्रसच्या उद्योगांना महाराष्ट्राची खुली ऑफर! गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
2

Devendra Fadnavis : सायप्रसच्या उद्योगांना महाराष्ट्राची खुली ऑफर! गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

Devendra Fadnavis : महाराष्ट्र बनेल न्यूक्लिअर पॉवर हब? अमेरिकन कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा
3

Devendra Fadnavis : महाराष्ट्र बनेल न्यूक्लिअर पॉवर हब? अमेरिकन कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा

OBC Non Creamy Layer: राज्य सरकारचा मोठा निर्णय; OBC नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादेत मोठी वाढ शक्य
4

OBC Non Creamy Layer: राज्य सरकारचा मोठा निर्णय; OBC नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादेत मोठी वाढ शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.