बिहार निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचा मास्टरप्लान; या मतदारांवर असणार विशेष लक्ष, भाजपचं टेन्शन वाढणार?
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे आज (दि.6) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. राहुल गांधींचा 6 ते 8 मार्च या कालावधीत मुंबई आणि अहमदाबादचा दौरा असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबईच्या दौऱ्यात राहुल गांधी हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाची माहिती घेणार आहेत. याशिवाय, तेथील कामगारांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
राहुल गांधींचा हा दौरा काँग्रेससाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मुंबईत त्यांची उपस्थिती स्थानिक पातळीवर पक्षाला बळकट करू शकते, तर गुजरातमध्ये सातत्याने कमकुवत होत असलेल्या काँग्रेससाठी नवी ऊर्जा निर्माण करू शकते. त्यातच मुंबई महापालिका निवडणूकही लवकरच होणार आहे. त्यादृष्टीनेही काही विचारविनिमय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल गांधी या भेटीदरम्यान काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे. यामध्ये आगामी निवडणुका आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. त्यांचा हा दौरा पक्षासाठी धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. विशेषतः महाराष्ट्रात पक्षाची स्थिती मजबूत करण्याच्या बाबतीत महत्वाचा ठरत आहे.
सकाळी अकराच्या सुमारास पोहोचतील मुंबईत
राहुल गांधी गुरूवारी सकाळी मुंबईहून दिल्लीला सकाळी नऊच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाने रवाना होतील आणि 11:10 च्या दरम्यान मुंबईत पोहोचतील. असे जरी असले तरी त्यांच्या कार्यक्रमाबाबत फारशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, बीकेसी येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये ते रात्री मुक्काम करणार असणार आहेत. 7 मार्चला सकाळी ते मुंबईहून अहमदाबादला रवाना होतील.
गुजरातमध्येही करणार दौरा
गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा आणि आगामी निवडणुकीची रणनीती तयार करण्याचा मार्ग म्हणून राहुल गांधींच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.