BMC
मुंबई: नालेसफाईच्या कामांसाठी यंदा १३० काेटी रुपयांचे कंत्राट (Contract Of 130 Crore) दिले आहे. या कामासाठी दरवर्षी काेट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र ही कामे वादग्रस्त ठरत आहेत. कंत्राटदारांच्या मर्जीनुसार नालेसफाईची टक्केवारी मुंबई पालिका (BMC) प्रशासन जाहीर करत असल्याची टीका हाेते. शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे नेते नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत हाेते. आता पालिकेतील लाेकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आहे. प्रशासक असलेले इक्बाल सिंग चहल (IqbalSing Chahal) यांचा या कामांवर आणि नालेसफाईच्या कामाच्या टक्केवारीवर वाॅच असणार आहे. मात्र यावेळीही नालेसफाई हाेणार की निधीसफाई (BMC Fund) असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या ताेंडावर नालेसफाईचा वाद प्रचाराचा मुद्दा बनणार आहे.
मोठ्या नाल्यांमधून सुमारे ४ लाख ९४ हजार ७३९ टन एवढा गाळ काढणे अपेक्षित आहे. यापैकी ७० टक्के, म्हणजे ३ लाख ४६ हजार ३१८ टन गाळ पावसाळ्यापूर्वी, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढला जातो असा दरवर्षी अंदाज प्रशासनाचा असतो. तसेच छोट्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ७० टक्के म्हणजेच, २ लाख २३ हजार टन, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येतो असा ढोबळ अंदाज प्रशासनाचा असताे. मात्र हा अंदाज कागदाेपत्री असताे. हा गाळ काढला जात नसल्याचा आराेप यापूर्वी विविध राजकीय पक्षांनी केला हाेता. त्यामुळे नालेसफाई वादात सापडली हाेती. आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता असून प्रशासक असलेले इक्बाल सिंग चहल यांना लक्ष केले जाण्याची शक्यता आहे.
[blockquote content=”नालेसफाईवर विराेधी पक्ष म्हणून आमचा अंकुश हाेता. आता प्रशासक नेमल्याने नालेसफाईची जबाबदारी प्रशासकांची आहे. ही कामे याेग्य प्रकारे झाली पाहिजेत. या कामात कंत्राटदारांना प्रशासन झुकते माप देत आहे. त्यामुळेच नालेसफाई याेग्य प्रकारे हाेत नाहीत. मुंबईकरांना दिलासा मिळेल अशी कामे व्हायला हवीत. ” pic=”” name=”- रवी राजा, माजी विराेधी पक्षनेते, मंबई महानगरपालिका”]
पावसाळा अगदी एका महिन्यावर येऊन ठेपल्याने, महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे जोर धरू लागली आहेत. प्रामुख्याने कंत्राट पद्धतीने करण्यात येत असलेल्या या कामांसाठी २०० कोटी रुपये खर्च होतो. या वर्षी साधारणपणे मोठ्या नाल्यांमधून ४ लाख ९४ हजार ७३९ टन एवढा गाळ काढण्याचे अंदाजित आहे. यापैकी ७० टक्के, म्हणजे ३ लाख ४६ हजार ३१८ टन गाळ पावसाळ्यापूर्वी, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढणे अंदाजित आहे, तसेच छोट्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ७० टक्के म्हणजेच, २ लाख २३ हजार ५७० टन, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येतो असा अंदाज आहे.
[read_also content=”पाच राज्यांमधील निवडणूक; ‘या’ मुद्द्यांच्या आधारे जाणून घ्या निकालाचा सविस्तर अर्थ https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/five-state-assembly-elections-result-understand-the-meaning-of-the-result-in-details-here-nrvb-252648.html”]
घाेटाळ्याचे आराेप
गाळाचे वजन करणे बंधनकारक नाल्यांतून काढलेला गाळ वाहून नेण्यातच मोठा घोटाळा होत असल्याचे २०१६ – २०१७ मध्ये समोर आले होते. त्यामुळे गाळाचे वजन, गाळ टाकण्यात येणाऱ्या जमिनीची सक्ती करणाऱ्या अटी कंत्राटामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. अटी मान्य नसल्याने ठेकेदारांनी २०१७ मध्ये वर्षीही निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. अखेर पालिकेला बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने विभाग स्तरावरील नाल्यांची सफाई करून घ्यावी लागली. विशेष म्हणजे राजकीय पक्षांसह स्वयंसेवा संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही पालिका प्रशासनाकडून होत असलेली नालेसफाई समाधानकारक होत नसल्याची टीका केली केली होती.