
१७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे (Photo Credit - X)
मुंबई: राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये धूलिकणांची (पार्टिक्युलेट मॅटर – PM) पातळी राष्ट्रीय मर्यादेपेक्षा (National Standards) जास्त असून, विशेषतः मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. ‘एन्वारोर्केटलिस्ट’ आणि ‘वातावरण फाऊंडेशन’ यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) गेल्या आठ वर्षांच्या आकडेवारीवर आधारित संयुक्त अहवाल नुकताच सादर केला आहे.
या अहवालानुसार, वायू प्रदूषणाच्या संकटात महाराष्ट्रातील सर्व शहरांचा समावेश झाल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील १७ शहरांनी PM 2.5 ची राष्ट्रीय मर्यादा (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) ओलांडली आहे आणि सर्व शहरांमध्ये PM 10 ची पातळी ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा अधिक आहे.
मुंबई आणि MMR परिसरातील स्थिती निधीचा वापर न झाल्यामुळे अधिक बिघडल्याचे दिसून येते
| निधीचा तपशील | माहिती |
| NCAP अंतर्गत मंजूर निधी | ९३८.५९ कोटी रुपये |
| वास्तविक वापरलेला निधी | ५७४.६४ कोटी रुपये |
ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण, उल्हासनगर, विरार आणि बदलापूर या MMR मधील शहरांची परिस्थितीही धोकादायक आहे:
‘एन्वारोकॅटलिस्ट’चे संस्थापक सुनील दहिया यांनी इशारा दिला आहे की, महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमध्ये धूलिकणांची पातळी धोकादायक आहे. आता ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या’ मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना कठोरपणे राबवण्याची वेळ आली आहे.
अहवालातील मुख्य शिफारसी: