Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना मुंबई आणि नवी मुंबईत घडलेल्या दोन दुर्घटनांनी या जल्लोषाला गालबोट लागले आहे. एका ठिकाणी मानवी थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे हंडीचा खांब कोसळल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 06, 2026 | 09:22 AM
दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई ऐरोलीत मानवी थर रचताना तोल जाऊन गोविंदाचा मृत्यू
  • खांब कोसळल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा अंत
  • मुंबईत १६८ गोविंदा जखमी तर २९ जण रुग्णालयात
नवी मुंबई: राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी मुंबईत घडलेल्या दोन दुर्घटनांनी हळहळ व्यक्त होत आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे मानवी थर रचताना तोल जाऊन खाली पडल्याने ३४ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. तर मालाडच्या मालवणी परिसरात दहीहंडीसाठी बांधलेला खांब कोसळल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत दहीहंडीच्या उत्सवादरम्यान १६८ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ऐरोलीत थरावरून पडून गोविंदाचा मृत्यू

नवी मुंबईतील ऐरोली येथील साईनाथवाडी परिसरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानवी मनोरा रचताना घणसोली येथील ३४ वर्षीय स्वप्निल नावाच्या गोविंदाचा तोल गेला. तो खाली पडल्याने गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर आयोजकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, रबाळे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

मालाडमध्ये खांब कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

दुसरीकडे, मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील चिकुवाडी येथे स्थानिक मुलांनी दहीहंडीचा उत्सव आयोजित केला होता. यावेळी हंडी फोडण्यासाठी दोर एका झाडाला आणि इमारतीच्या तळमजल्यावरील खांबाला बांधण्यात आला होता. हंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हा खांब अचानक कोसळला. यावेळी सात वर्षीय रुद्र कदम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दहीहंडीदरम्यान १६८ गोविंदा जखमी

मुंबईतील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना झालेल्या दुर्घटनांमध्ये शनिवारी रात्रीपर्यंत १६८ गोविंदा जखमी झाल्याची नोंद सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये झाली. यापैकी २९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर ८१ जणांवर उपचार सुरू होते. उपचारानंतर ५८ गोविंदांना घरी सोडण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, सेंट्रल रिजनमधील रुग्णालयांत १०६, ईस्टर्न सबर्ब्समध्ये २९ आणि वेस्टर्न सबर्ब्समध्ये ३३ जखमी गोविंदांची नोंद झाली.

केईएम रुग्णालयात सर्वाधिक ३३ जखमी गोविंदांची नोंद झाली. याशिवाय राजावाडी रुग्णालयात २०, नायरमध्ये १७, पोतदारमध्ये १६, हिंदुजा येथे १४, बीडीबीए रुग्णालयात १३ आणि सायन रुग्णालयात आठ जखमी गोविंदांवर उपचार करण्यात आले. दरवर्षी दहीहंडीच्या उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना गोविंदांना दुखापत होण्याच्या घटना घडतात. यंदाही उत्साह आणि थरार कायम असताना दोन जीव गमावल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Dahi handi celebrations marred 168 govindas injured one dies after falling from the human pyramid while a young child loses his life after a pole collapses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Accident
  • Dahi Handi 2026

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन
2

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
3

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
4

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.