Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Maps चा नाद नको गं बाई! ग्वाल्हेर अपघातानंतर पुन्हा प्रश्न ऐरणीवर; चुकीच्या मार्गाला जबाबदार कोण?

Google Maps : ग्वाल्हेर दुर्घटनेनंतर गुगल मॅपच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बरेली, केरळ आणि महाराष्ट्रातील घटनांच्या पार्श्वभूमीवर चुकीचे मार्ग, अपूर्ण पूल आणि अपघातांची कारणे जाणून प्रशासन प्रयत्नशील आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 19, 2026 | 07:53 PM
Google Maps चा नाद नको गं बाई! ग्वाल्हेर अपघातानंतर पुन्हा प्रश्न ऐरणीवर; चुकीच्या मार्गाला जबाबदार कोण?

Google Maps चा नाद नको गं बाई! ग्वाल्हेर अपघातानंतर पुन्हा प्रश्न ऐरणीवर; चुकीच्या मार्गाला जबाबदार कोण?

Follow Us
Follow Us:
  • ग्वाल्हेर अपघातानंतर डिजिटल नेव्हिगेशनवर प्रश्नचिन्ह
  • चुकीच्या मार्गाच्या वापरामुळे अनेक ठिकाणी अपघात
  • शॉर्टकटपेक्षा सुरक्षित प्रवास महत्त्वाचा
 

ज्या ठिकाणाचा पत्ता आपणास ठाऊक नसतो, अशा वेळी आपण हमखास Google Maps चा वापर करतो. तसेच अनेकदा शॉर्टकट मारण्याच्या नादात आपण ‘गुगल बाबा’वर विश्वास ठेऊन 100 ते 150 च्या वेगाने गाडी हाकतो. मात्र हाच गुगलवरील विश्वास अनेकदा जीवघेणा असाच ठरला आहे.
नव्याने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येते घडलेल्या भीषण अपघातानंतर Google Mapsच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चुकीचे मार्ग, अपूर्ण पूल आणि प्रतिबंधित रस्त्यांवरून वाहने गेल्यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

देशाला हादरवणारी घटना ग्वाल्हेरमध्ये घडली. येथे आतापर्यंत 17 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. मात्र या दुर्घटनेला फक्त Google Maps जबाबदार असल्याचे अद्याप निश्चित झालेलं नाही. अपघाताचे नेमकं कारण, वाहनातील तांत्रिक बिघाड आणि चुकीच्या मार्गाची भूमिका यांची चौकशी करूनच जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गामुळे अपघातांचा धोका?

देशात महामार्ग, एक्स्प्रेस वे आणि पुलांचे जाळे वेगाने पसरत आहे. त्याच वेळी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, तसेच काही पूल अपूर्ण आहेत, तर काही मार्गांवर वाहतुकीस निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत डिजिटल नकाशावरील माहिती आणि प्रत्यक्ष रस्त्याची स्थिती यामध्ये तफावत असल्याचे वेळोवेळी पाहण्यास मिळाले आहे.
दरम्यान, या परिस्थितीमुळे वाहनचालक अडचणीत येण्याची शक्यता असते. विशेषतः अवजड वाहनांना अरुंद रस्त्यांवरून किंवा तीव्र उताराच्या मार्गावरून जावे लागल्यास धोका वाढू शकतो. त्यामुळे नेव्हिगेशन अ‍ॅपमधील माहिती अद्ययावत ठेवण्याबरोबरच रस्त्यांवरील सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करणेही महत्त्वाचे आहे.

CJP Leaders SEM Court Hearing: आशुतोष रांका, सौरव दास यांच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ? पोलिसांच्या मागणीवर कोर्टाचा निर्णय राखीव

ग्वाल्हेर दुर्घटनेत नेमके काय घडले?

ग्वाल्हेरचे सीएसपी रवी भदौरिया यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेतमाल घेऊन जाणारे ट्रक डबरा मंडीतून येत होते. चालक या परिसरातील नसल्यामुळे त्याने Google Mapsवरून मार्ग शोधला असावा आणि कमी अंतराचा रस्ता निवडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच मंदिराजवळील घाटाच्या परिसरात येताच ट्रकच्या प्रेशर रिलीज यंत्रणेत बिघाड झाल्या, ज्यामुळे त्याचे ब्रेक निकामी झाले व तो गर्दी असलेल्या ठिकाणी शिरला, ज्यामुळे मोठा भीषण अपघात घडला.

Manipur Violence : धगधगतं मणिपूर! ४ जणांच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक; मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर मृतदेह ठेवले

शॉर्टकटपेक्षा सुरक्षित प्रवास महत्त्वाचा

Google Mapsचा वापर करताना वाहनचालकांनी केवळ स्क्रीनवरील मार्गावर अवलंबून राहू नये. रस्त्यावरील दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना यांना प्राधान्य द्यावे. विशेषतः अवजड वाहनांच्या चालकांनी वाहनाच्या आकाराला, वजनाला आणि रस्त्याच्या क्षमतेला अनुरूप मार्ग निवडणे आवश्यक आहे.

तसेच, नेव्हिगेशन कंपन्या, रस्ते बांधकाम विभाग आणि प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून बंद किंवा धोकादायक मार्गांची माहिती वेळेवर अद्ययावत करणे गरजेचे आहे. ग्वाल्हेर दुर्घटनेने तंत्रज्ञानावर आंधळेपणाने अवलंबून राहिल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्याने शॉर्ट कट निवडण्यापेक्षा सुरक्षित प्रवास निवडला असता, तर आज अनेकांचे प्राण वाचले असते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गामुळे अपघात होऊ शकतो का?

    Ans: होय, नकाशावरील माहिती आणि प्रत्यक्ष रस्त्याची स्थिती यात फरक असल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो. मात्र प्रत्येक अपघातासाठी गुगल मॅपच जबाबदार असतो, असे म्हणता येत नाही.

  • Que: ग्वाल्हेर दुर्घटनेत गुगल मॅपची चूक निश्चित झाली आहे का?

    Ans: चालकांनी शॉर्टकट निवडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र वाहनातील ब्रेकशी संबंधित तांत्रिक बिघाडाचाही उल्लेख आहे. अंतिम जबाबदारी तपासानंतरच निश्चित करता येईल.

  • Que: गुगल मॅप वापरताना कोणती काळजी घ्यावी?

    Ans: रस्त्यावरील दिशादर्शक फलक आणि बॅरिकेडिंगचे पालन करावे. मार्ग संशयास्पद किंवा धोकादायक वाटल्यास पुढे जाण्याऐवजी सुरक्षित पर्यायी मार्ग निवडावा.

Web Title: Google maps wrong route accidents gwalior safety concerns rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • Accident
  • Google maps
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

Palghar News: दुर्वेस नाका येथे काळाचा घाला! जिन्यावर चक्कर येऊन पडताना कात्री छातीत घुसली; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
1

Palghar News: दुर्वेस नाका येथे काळाचा घाला! जिन्यावर चक्कर येऊन पडताना कात्री छातीत घुसली; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

West Bengal वर दुर्गा माता कोपली…! रविवार ठरला ‘अपघातवार’, 5 जणांचा मृत्यू
2

West Bengal वर दुर्गा माता कोपली…! रविवार ठरला ‘अपघातवार’, 5 जणांचा मृत्यू

Accident News: नवरात्रीत काळाचा घाला! माता मंदिराजवळ भरधाव ट्रकचा कहर; १२ भाविकांचा मृत्यू
3

Accident News: नवरात्रीत काळाचा घाला! माता मंदिराजवळ भरधाव ट्रकचा कहर; १२ भाविकांचा मृत्यू

Rajasthan Borewell Accident : 22 तासांपासून मृत्यूशी झुंज!  9 वर्षांच्या भोमारामला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
4

Rajasthan Borewell Accident : 22 तासांपासून मृत्यूशी झुंज! 9 वर्षांच्या भोमारामला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.