
Eknath Shinde corporators and Uddhav Thackeray are in the same hotel mayor bmc election 2026
मुंबई महापालिका निवडणूकीमध्ये भाजपाचे 89 आणि शिवसेना शिंदे गटाचे 29 उमेदवार निवडून आले. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट मिळून मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे महापौर पद हे अडीच वर्षांसाठी मागितले असल्याचा दावा देखील केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट आला आहे. शिवसेना अडीच वर्ष आणि भाजपा अडीच वर्ष असे महापाैरपद द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जात आहे. याच पार्श्वभमूीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.
हे देखील वाचा : सांगलीत भाजपला सत्तेचा काटेरी मुकुट! काठावरच्या बहुमताने इकडे आड-तिकडे विहीर; बहुमताच्या जुळणीने झाले बेजार
मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या निकालानंतर महापौरपदाभोवतीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. मुंबईत तथाकथित “हॉटेल राजकारण”ची चर्चा जोरात सुरू आहे. खासदार संजय राऊत यांचे हे विधान चर्चेत आले आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील विजयी नगरसेवक या हॉटेलमध्ये राहत आहेत. राऊत यांनी उपहासात्मकपणे म्हटले आहे की ते फक्त जेवण्यासाठी तिथे जात होते आणि कोणीही यावर अनावश्यक संशय घेऊ नये. जर महायुतीकडे बहुमत असेल तर त्यांना त्यांच्या नगरसेवकांना अशा प्रकारे बंदिस्त का ठेवावे लागले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, जर देवाची इच्छा असेल तर महापौर हा आमचाच होईल. उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये हे विधान केल्याचे कळतंय. कारण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले, यासोबतच भाजपालाही हवे तेवढे संख्याबळ नाही. दुसरीकडे मुंबईचा महापाैर आमच्या पक्षाचा व्हावा, ही इच्छा कालही होती आणि आजही आहे, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : “आपल्याकडं ही गुंतवणूक का नाही? CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर रोहित पवारांचा सवाल
आमच्यावर संशय घेऊ नका
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, “मुंबईचा महापौर शिवसेना ठाकरे बंधूंचा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा झाल्या आहेत. मी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पडद्यामागे अनेक हालचाली होत आहेत, असे स्पष्ट करत मी आणि काही नेते हे आज ताज लैंड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. मला कालच जायचं होत, पण समजलं इथे तर कोंडवाडा झाला आहे. मात्र आमच्यावर संशय घेऊ नका,” असे सूचक विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१८) माध्यमांशी बोलताना केले.