गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्याबाबत आमदार रोहित पवार यांची ट्विटर पोस्ट केली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन मुख्यमंत्र्यांच्या दावौस दौऱ्यावर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी इतर शेजारील राज्यांमध्ये येणाऱ्या गुंतवणुकीबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले की, Disney ही मनोरंजन क्षेत्रातील तर Honeywell ही सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानांतील आघाडीची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात विस्तार करण्यासाठी बंगळुरु मधील बेलंदुर ची निवड केलीय. Disney ने बेलंदुर इथे 1,74,000 Sqft जागा भाड्याने घेण्याचा करार केलाय तर honeywell ने तब्बल 4,00,000 Sqft चं ऑफिस सात वर्षांसाठी घेतलंय.
हे देखील वाचा : व्हॉट्सअॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral
त्याचबरोबर Deloitte ने देखील मंगलुरु मध्ये येऊन तब्बल 50,000 लोकांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. maruti suzuki तब्बल 35000 कोटी गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवा प्लांट उभारत आहे. मुंबई पर्यायाने महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन असताना व राज्यात बेरोजगारी वाढत असताना या कंपन्या आपल्याकडं ही गुंतवणूक का करत नाहीत, असा एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो, असे मत आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले.
Disney ही मनोरंजन क्षेत्रातील तर Honeywell ही सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानांतील आघाडीची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात विस्तार करण्यासाठी बंगळुरु मधील बेलंदुर ची निवड केलीय. Disney ने बेलंदुर इथे 1,74,000 Sqft जागा भाड्याने घेण्याचा करार केलाय तर honeywell ने तब्बल… pic.twitter.com/4PsYmXeFe0 — Rohit Pawar (@RRPSpeaks) January 18, 2026
पुढे त्यांनी लिहिले आहे की, आजपासून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोस दौऱ्यावर जात आहेत. या दोघांनी शर्थीचे प्रयत्न करून जागतिक दर्जाच्या अशा नामांकित कंपन्यातून राज्यात जास्ती जास्त गुंतवणूक आणून राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा ही, अपेक्षा! अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
हे देखील वाचा : दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब..! वॉशरुममध्ये सापडली चिठ्ठी अन् करावे लागले Emergency Landing
उद्यापासून (दि.19) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत असणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला ते उपस्थित असतील. मुख्यमंत्री 19 ते 23 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये असतील. गेल्यावर्षी राज्य सरकारने जवळपास 16 लाख कोटींहून अधिकचे करार केले होते. यंदाही तितकेच करार करण्याचे सरकारचे लक्ष आहे. तर गेल्यावेळी केलेल्या करारातील 72 टक्के MoU प्रत्यक्षात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.






