Eknath Shinde On On Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाबाबतच्या मागणीला यश आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळत उपोषण मागे घेतले आहे. सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करून मराठा आरक्षणाचा जीआर (शासकीय निर्णय) काढला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरात मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनाबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चळवळी केल्या आहेत. ते एक संवेदनशील व्यक्ती असून, त्यांच्या या चळवळीला आज यश आले आहे.”
मुंबईत आलेल्या सर्व मराठा समाजातील बंधू-भगिनींचेही मी आभार मानतो. आंदोलन आता संपले आहे आणि सरकारने त्यांच्या मागण्यांना सकारात्मक आणि व्यावहारिक प्रतिसाद दिला आहे…”
शिंदे पुढे म्हणाले, “आमच्या सरकारने या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. सरकारमधील प्रत्येक व्यक्तीने यासाठी आपली भूमिका बजावली. मनोज जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मागणी होती, ती आमच्या सरकारने जीआर (शासन निर्णय) म्हणून जारी केली आहे.” अखेरीस, या मोठ्या आंदोलनाला यशस्वीरित्या थांबवल्याबद्दल शिंदे यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले.
#WATCH | Mumbai: On the Maratha Reservation agitation, Maharashtra Deputy CM Eknath Shinde says, “Manoj Jarange Patil, who was the leader of the movement, has always conducted movements to deliver justice to the Maratha community. He is a sensitive person, and his movement has… pic.twitter.com/mLAjjjAldr
— ANI (@ANI) September 2, 2025
मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाच्या हिताचा तोडगा काढला आहे. त्यामुळे जे काही उपोषण सुरू होते ते आता संपवण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आमची सुरुवातीपासून तयारी होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांची सरसकट ही जी मागणी होती ती, त्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघता सरसकट करणे शक्य नव्हते.
जीआर निघाला आहे. तसेच अन्य मागण्या देखील मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केल्या. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी अभ्यास करून चर्चा करून मार्ग काढला आहे. आम्ही यावर सांविधानिक तोडगा काढू शकलो आहोत, जो कोर्टात देखील टिकेल. मी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे. त्यांनी उत्तम कामे केले आहे. यामध्ये मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागला, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो.
सातत्याने राजकारणात टीका सहन करावी लागते. टीका झाली तेव्हा देखील मी विचलित झालो नाही. समाजाला न्याय द्यायचा, दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत , तेढ निर्माण होणार नाही, हेच ध्येय माझ्यासमोर होते. मला दोष, शिव्या दिल्या तरी मी समाजासाठी कालही काम करत होतो, आजही करत आहे आणि उद्याही करत राहणार आहे.