Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेडरेशन ऑफ प्रेस क्लबची स्थापना, मुंबई प्रेस क्लबचे समर खडस फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी

आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये प्रेस क्लब होते. राष्ट्रीय स्तरावरील महासंघाची आता स्थापना करण्यात आली असून मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस यांची फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 28, 2026 | 12:41 AM
फेडरेशन ऑफ प्रेस क्लबच्या उपाध्यक्षपदी समर खडस यांची नियुक्ती

फेडरेशन ऑफ प्रेस क्लबच्या उपाध्यक्षपदी समर खडस यांची नियुक्ती

Follow Us
Follow Us:
  • फेडरेशन ऑफ प्रेस क्लबची स्थापना 
  • आठ प्रमुख क्लबने यासाठी घेतला पुढाकार
  • मुंबई प्रेस क्लबचे समर खडस यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती
देशभरातील प्रेस क्लबला एकत्र येत फेडरेशन ऑफ प्रेस क्लब या राष्ट्रीय स्तरावरील महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई प्रेस क्लबसह देशभरातील आठ प्रमुख क्लबने यासाठी पुढाकार घेतला असून देशभरातील पत्रकार स्वातंत्र्य, पत्रकारांचे संरक्षण, कल्याण आणि माध्यम क्षेत्रातील व्यावसायिक प्रगती या उद्दिष्टांसाठी देशातील आठ प्रमुख प्रेस क्लब्सनी एकत्र येत हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस यांची या फेडरेशनच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

एकसमान व्यासपीठ उपलब्धतेचा उद्देश 

देशभरातील पत्रकार संघटनांना एकसमान राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट, १८६० अंतर्गत या महासंघाची नोंदणी करण्यात आली आहे. या महासंघाचे संस्थापक सदस्य म्हणून प्रेस क्लब ऑफ इंडिया, मुंबई प्रेस क्लब, प्रेस क्लब कोलकाता, प्रेस क्लब हैदराबाद, चंदीगड प्रेस क्लब, स्टेट प्रेस क्लब मध्य प्रदेश, गुवाहाटी प्रेस क्लब आणि अगरतळा प्रेस क्लब यांचा समावेश आहे.

महासंघाच्या १० सदस्यीय गव्हर्निंग कौन्सिलचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रेस क्लब ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष गौतम लाहिरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कोलकाता प्रेस क्लबचे अध्यक्ष स्नेहाशीस सूर, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस आणि हैदराबाद प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय रेड्डी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. चंदीगड प्रेस क्लबचे अध्यक्ष सौरभ दुग्गल हे सरचिटणीस असतील. याशिवाय संगीता बरुआ पिशारोटी (सहसरचिटणीस), नीरज ठाकूर (कोषाध्यक्ष), प्रवीण खारीवाल, प्रणब सरकार आणि कागेन कलिता यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. देशातील पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातील व्यावसायिकांचा सामूहिक आवाज अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

Mumbai Press Club: मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी, एका ईमेलमुळे मोठी खळबळ

कोण आहेत समर खडस 

समर खडस हे सध्या मुंंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक पत्रकार आणि फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांना योग्य काम मिळावे यासाठी मुंबई प्रेस क्लबमध्ये अनेक उपक्रम राबवले असून महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये ते पॉलिटिकल एडिटर म्हणून कार्यरत आहेत. मुंबई प्रेस क्लबला पुढे आणण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. 

Bhima Koregaon Case प्रकरणी एनआयएकडून तीन जणांची चौकशी; मुंबई प्रेस क्लबच्या माजी सदस्यांना समन्स

१०-सदस्यीय नियामक परिषद स्थापन

संघराज्याचा कारभार पाहण्यासाठी १०-सदस्यीय नियामक परिषद स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे—

  • गौतम लाहिरी – अध्यक्ष (माजी अध्यक्ष, प्रेस क्लब ऑफ इंडिया)
  • स्नेहाशिष सूर – उपाध्यक्ष (अध्यक्ष, प्रेस क्लब कोलकाता)
  • समर खडस – उपाध्यक्ष (अध्यक्ष, मुंबई प्रेस क्लब)
  • विजय रेड्डी – उपाध्यक्ष (अध्यक्ष, प्रेस क्लब हैदराबाद)
  • सौरभ दुग्गल – महासचिव (अध्यक्ष, चंदीगड प्रेस क्लब)
  • संगीता बरुआ पिशारोटी – सहायक महासचिव (अध्यक्ष, प्रेस क्लब ऑफ इंडिया)
  • नीरज ठाकूर – खजिनदार (माजी महासचिव, प्रेस क्लब ऑफ इंडिया)
  • प्रवीण खारीवाल – कार्यकारी सदस्य (अध्यक्ष, स्टेट प्रेस क्लब, मध्य प्रदेश)
  • प्रणब सरकार – कार्यकारी सदस्य (अध्यक्ष, आगरतळा प्रेस क्लब)
  • कागेन कलिता – कार्यकारी सदस्य (अध्यक्ष, गुवाहाटी प्रेस क्लब)
फेडरेशन ऑफ प्रेस क्लब्सची स्थापना हे देशातील पत्रकार संघटनांमध्ये उत्तम समन्वय, समान मुद्द्यांवर एकजूट आणि माध्यमांशी संबंधित समस्यांवर राष्ट्रीय स्तरावर प्रभावी हस्तक्षेप करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.

Web Title: Federation of press clubs established mumbai press club s samar khadas appointed as federation vice president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:41 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Mumbai press club

संबंधित बातम्या

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
1

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
2

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
4

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.