Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalbaugcha Raja Visarjan 2025 Live: अखेर लालबागच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, ‘इथे’ क्लिक करुन घ्या शेवटच दर्शन

अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लालबागच्या राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली आहे आणि ती आता विसर्जनासाठी समुद्रात मार्गस्थ झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 07, 2025 | 09:10 PM
Lalbaugcha Raja Visarjan 2025 (Photo Credit- X)

Lalbaugcha Raja Visarjan 2025 (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा इतिहासात पहिल्यांदाच विलंब झाला असला, तरी आता हा सोहळा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली आहे आणि ती आता विसर्जनासाठी समुद्रात मार्गस्थ झाली आहे. या सोहळ्यात लालबागच्या राजाची शेवटची आरती पार पडली. या आरतीसाठी अनंत अंबानी उपस्थित होते. रविवारी रात्री ८ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या राजाच्या मूर्तीला समुद्रातील उंच लाटा आणि काही तांत्रिक अडचणींमुळे विसर्जनासाठी विलंब झाला होता.

मात्र, मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस प्रशासन आणि अथक प्रयत्नांमुळे ही मोठी अडचण दूर झाली. आता ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात कोट्यवधी भाविकांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

 

हे देखील वाचा: मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

मंडळाकडून दिलगिरी व्यक्त

मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी या परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “लालबागच्या राजाचे विसर्जन भरती आणि ओहोटी वर अवलंबून असते. आम्ही चौपाटीवर पोहोचण्यापूर्वीच भरती सुरू झाली होती. त्यामुळे, भरती ओसरण्याची वाट पाहणे आवश्यक होते.” सुधीर साळवी यांनी रात्री साडे दहा ते अकरा वाजता विसर्जन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली. त्यांनी पुढे सांगितले की, “लालबागचा राजा करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणे महत्त्वाचे होते. उशिरा झालेल्या विसर्जनामुळे आम्ही सर्व भाविकांची दिलगिरी व्यक्त करतो.” या विलंबामुळे मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल साळवी यांनी त्यांचे आभार मानले. माध्यमांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अखेर, अथक परिश्रमांनंतर राजाचा निरोप समारंभ पूर्ण होत असल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विसर्जन वेळेत का झाले नाही?

दरवर्षीप्रमाणे, दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे सकाळी 8 वाजण्यापूर्वी लालबागचा राजाच्या मूर्तीचे खोल समुद्रात विसर्जन करण्याची तयारी सुरू होती. मात्र, रविवारी सकाळी आलेल्या समुद्रातील जोरदार भरतीमुळे आणि विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन तराफ्याच्या तांत्रिक अडचणींमुळे मूर्तीला तराफ्यावर चढवणे कठीण झाले. यामुळे, गेल्या आठ तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती समुद्रातच होती.

Web Title: Finally on the way for the immersion of the lalbaugcha raja click here to have the last darshan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 09:01 PM

Topics:  

  • Anant Chaturdashi 2025
  • Lalbaugcha Raja
  • Mumbai

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
3

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
4

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.