Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

घणसोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. परिसरातील हाच पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध करत, डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2026 | 01:39 PM
घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

Follow Us
Follow Us:
  • घणसोली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला.
  • संतप्त आंदोलकांनी रस्त्यावरच आंघोळ आणि दात घासत प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
  • पाणीप्रश्न तातडीने सोडवला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून, परिसरात मोठ्या संख्येने महिला आणि ज्येष्ठ नागरिकही आंदोलनात सहभागी झाले.
सावन वैश्य, नवी मुंबई:

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या घणसोलीतील नागरिकांनी गुरुवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी संतप्त रहिवाशांनी डोक्यावर हंडे घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी चक्क रस्त्यावर बसून आंघोळ करत आणि दात घासत महापालिकेच्या कारभाराचा अनोखा निषेध नोंदवला.

Pune DJ Ban Protest : विद्यानंद बापटांच्या मारहाणीनंतर राजकारण तापणार; रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी पालिकेवर महामोर्चा!

शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक सौरभ शिंदे आणि समाजसेवक सुनील मस्कर यांच्या नेतृत्वाखाली हा ‘हंडा मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण घणसोली परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. महापालिकेकडून वेळेवर पाणी पुरवले जात नसल्याने दैनंदिन कामे खोळंबली असून नागरिकांचे हाल होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी ही कायमस्वरूपी सोय नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

पाण्यासाठी वारंवार पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. महापालिकेकडून वेळेवर पाणी पुरवले जात नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेकडो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत पालिका कार्यालयाला वेढा घातला. आंदोलनकर्त्यांनी चक्क रस्त्यावर बसून आंघोळ करत आणि दात घासत महापालिकेच्या कारभाराचा अनोखा निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. पाणीप्रश्न लवकर न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

‘राजकारणासाठी जनतेला वेठीस धरू नका’

“पाणीप्रश्नावरून घाणेरडे राजकारण सुरू आहे. जे काही राजकारण करायचे असेल ते माझ्यासोबत करा, पण निष्पाप व गरीब जनतेला पाण्यासाठी वेठीस धरू नका. नागरिकांचा पाणीप्रश्न सुटणार असेल, तर मी नगरसेवकपदाचा राजीनामा देण्यासही तयार आहे,” असा इशारा या वेळी नगरसेवक सौरभ शिंदे यांनी दिला.

Web Title: Ghansoli water crisis residents protest with matka morcha over irregular water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा
1

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान
2

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?
3

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
4

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.