Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News :इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला

World News : इराणकडून अमेरिकन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचे कट रचले जात असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने मध्यपूर्वेतील राजनैतिक कार्यालयांमधील कर्मचारी कमी करण्यास सुरुवात केली आहे. सौदी अरेबियातून अनावश्यक कर्मचारी आणि कुटुंबीयांना बाहेर पडण्याचे आदेश दिल्याने तणाव वाढला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 24, 2026 | 07:20 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • गुप्तचर यंत्रणेचा इशारा ; अमेरिकन अधिकाऱ्यांना लक्ष करण्याचा कट
  • सौदी अरेबियासह पाच देशातील सुरक्षेची चिंता
  • संघर्ष पुन्हा भडकण्याची चिन्हे
World News : इराणवर अमेरिका आणि इस्रायल पुन्हा एकदा जोरदार हल्ल्या करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आणखी एक महत्वपूर्ण घटना घडत असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला समजले असता . अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने लगेचच अमेरिकेच्या सरकारला एक निरोप दिला आणि अमेरिका लगेचच कामालाही लागली आहे . इराणकडून अमेरिकन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष करण्याचे कट रचले जात असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर वॊशिंग्टनमध्ये खळबळ उडाली आहे .

येणाऱ्या हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या राजनैतिक कार्यालयांतील कर्मचारी संख्या कमी करण्यास सुरवात केली आहे . या निर्णयामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे . इराणने आपली चाल खेळायला सुरवात केली असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत . कारण अमेरिकेला हे माहिती आहे कि मध्यपूर्वेत कुठेही अमेरिकेने लपण्याच्या प्रयत्न केला तरी इराणच्या मिसाईल्स आणि ड्रोन तिथपर्यंत पोहचू शकतात . याचे प्रत्यक्ष अनुभव सुद्धा अमेरिकेने गेल्या काही काळातल्या युद्धात अनुभवले आहेत .

Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना

गुप्तचर यंत्रणेचा इशारा ; अमेरिकन अधिकाऱ्यांना लक्ष करण्याचा कट

अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक जे क्लेटर यांनी २३ ऑक्टोबर रोजी परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांना एक निवेदन पाठवले आणि त्यामध्ये इराणच्या संभाव्य कारवायांबाबत गंभीर इशारा दिला . इराणने अमेरिकन कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक वाढवले असून , काही जीवघेण्या कटांनी आधीच कारवाईला सुरवात केल्याचे गुप्तचर माहितीमध्ये सांगितले आहे .

त्याचबरोबर हे टार्गेट्स फक्त मध्य पूर्वेपुरते मर्यादित नसून इतरही काही देशांमध्ये अमेरिकन नागरिकांना लक्ष करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे . मात्र कोणती ठिकाणे आणि व्यक्ती निशाण्यावर आहेत हे अजूनतरी जाहीर करण्यात आलेले नाही .

Philippines Plane Crash: हवेतच झाला चक्काचूर! फिलीपिन्समध्ये 2 लष्करी प्रशिक्षण विमानांची एकमेकांना टक्कर; 4 वैमानिकांचा मृत्यू

सौदी अरेबियासह पाच देशातील सुरक्षेची चिंता

गुप्तचर विभागाची माहिती मिळताच अमेरिका ताबडतोब कामाला लागली आणि तिने आपल्या कार्यालयांवरील सुरक्षा अजूनच कडक केली केली आहे . सौदी येथील रियाध दूतावास तसेच जेद्दाह , धहरान येथील वाणिज्य दूतावास यामधील अनावश्य्क कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याशिवाय जॉर्डन , लेबनॉन , कतार आणि संयुक्त अरब अमिरातमधील कर्मचारी संख्या कमी केली जात आहे . तरीही या चार देशांमधील दूतावास मर्यदित कामकाजासह सुरूच राहणार आहेत .

संघर्ष पुन्हा भडकण्याची चिन्हे

इराणसोबतच येमेनमधील हुथींच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे . सौदी अरेबियातील तेल प्रकल्प , विमानतळ आणि इतर महत्वाच्या ठिकाणांना टार्गेट केले जात आहे . सगळ्या आखाती देशांतील सुरक्षा कडक करण्यात आली आहे . डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण चर्चेसाठी तयार न झाल्यास परत जोरदार हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत . त्यामुळे या दोन देशातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे.

 

Web Title: American officials in irans crosshairs us swings into action immediatelycp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • America news
  • Iran Attack
  • Marathi News
  • Middle East War Impact

संबंधित बातम्या

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल
1

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल

Ashwini Mahangade Wedding ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?
2

Ashwini Mahangade Wedding ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?
3

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य
4

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.