Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

 गोरेगाव येथील मोरारजी मिल म्हाडा संकुल 1 बी सहकारी गृहनिर्माण संस्थेत रूम नंबर 1811 खरेदी करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही वर्षभराहून अधिक काळ घर नावावर झाले नसल्याचा आरोप रहिवाशी प्रियांका पराग सुकी यांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 29, 2026 | 06:46 PM
पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Follow Us
Follow Us:
  • घर 1811 चे, NOC मात्र 1510 ची
  • गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
  • मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवाशाचा गंभीर आरोप
प्रत्येकाचे स्वप्न असते की एखाद्या जागेची मालकी असावी आणि त्याला आपले घर म्हणावे. हे जितके सोपे वाटेल तितकेच हा प्रवास आव्हानात्मक आहे. अशीच एक घटना गोरेगावमधील मोरारजी मिल म्हाडा संकुल 1 बी सहकारी गृहनिर्माण संस्थेतून समोर आली आहे. गोरेगावमधील मोरारजी मिल म्हाडा संकुल 1 बी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथे घर खरेदी केल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही वर्षभराहून अधिक काळ घर नावावर झाले नसल्याचा आरोप रहिवासी प्रियांका पराग सुकी यांनी केला आहे. सोसायटीकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रियांका सुकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च 2025 रोजी घर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी सोसायटीकडे आवश्यक अर्ज करण्यात आला आणि 25 हजार रुपयांचा चेकही देण्यात आला. सुकी यांनी रूम नंबर 1811 खरेदी केला आहे. मात्र, त्यांना रूम नंबर 1811 ऐवजी रूम नंबर 1510 ची NOC देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही चुकीची NOC मुद्दाम देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.’

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

आवश्यक व्यवहार आणि कागदपत्रांची प्रक्रिया करूनही मार्च 2025 पासून सप्टेंबर 2026 पर्यंत रूम नंबर 1811 त्यांच्या नावावर हस्तांतरित झालेली नसल्याचे सुकी यांचे म्हणणे आहे. या कालावधीत योग्य NOC मिळवण्यासाठी तसेच घर हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोसायटीसोबत वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रश्न मार्गी लागत नसल्याने गेल्या वर्षभरापासून न्यायालयीन प्रक्रियेलाही सामोरे जावे लागत असल्याचा दावा सुकी यांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा आणि कोर्टाच्या फेऱ्यांनंतरही प्रकरणाचा अंतिम तोडगा निघालेला नसल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

याशिवाय, इमारतीतील कार्यकारी अधिकाऱ्याकडून आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचाही आरोप प्रियांका सुकी यांनी केला आहे. घर खरेदी केल्यानंतर आवश्यक रक्कम भरून आणि प्रक्रिया पूर्ण करूनही मालकी हस्तांतरण का रखडले, तसेच रूम नंबर 1811 ऐवजी 1510 ची NOC का देण्यात आली, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची संबंधित यंत्रणांनी दखल घेऊन योग्य चौकशी करावी आणि घर हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून न्याय द्यावा, अशी मागणी प्रियांका सुकी यांनी केली आहे.

तसेच याप्रकरणी नवराष्ट्रकडून गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुल सोसायटीचे अध्यक्षांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Web Title: Goregaon morarji mill mhada housing society flat transfer delay wrong noc resident allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Goregaon
  • mhada
  • Mumbai

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त
2

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त

Mumbai News : सार्वजनिक शौचालयात दोघांचा मृत्यू; रासायनिक वायूमुळे मृत्यूचा संशय, पोलिसांचा तपास सुरू ….
3

Mumbai News : सार्वजनिक शौचालयात दोघांचा मृत्यू; रासायनिक वायूमुळे मृत्यूचा संशय, पोलिसांचा तपास सुरू ….

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
4

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.