Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात; ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून ठाण्यावरून वाशी आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळापुरती बंद करण्यात आली आहे. तसेच रस्स्त्यावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 24, 2026 | 08:17 PM
Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात; ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात; ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

Follow Us
Follow Us:
  • मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
  • तुर्भे-कोपरखैरणे दरम्यान पाणी भरल्याने ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
  • नालासोपाऱ्यातही अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून घरं-दुकानांत पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
Rain Updates: मुंबई, नवी मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. अनेक भागात पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच तुर्भे आणि कोपरखैरेने स्थानकादरम्यान पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. ठाण्यावरून वाशी आणि पनवेलच्या दिशेने जाणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक काही काळापुरती बंद करण्यात आली आहे. पावसामुळे दृष्मानात कमी झाल्याने रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे.

Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…

वाशी आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद

सकाळी कामावर जाण्याची घाई असते आणि अशाच वेळी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील उशिराने सुरू आहे. ठाण्यावरून वाशी आणि पनवेलच्या दिशेने जाणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने प्रवासी वैतागले आहेत. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहेत. तसेच वाहतूक पुन्हा सुरू होईपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला मार्गे हार्बर मार्गावरवरून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

पहिल्याच पावसात मुंबईकर हैराण

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना पावसाची प्रतिक्षा होती. उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता पहिल्याच पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांना रेल्वे आणि रस्ते वाहतुकीने प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पहिल्याच पावसात नालासोपारा जलमय

तसेच नालासोपाऱ्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे नालासोपाऱ्यातील अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. स्थानिक प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या नालेसफाईच्या आणि रस्ते विकासकामांच्या दाव्यांची पहिल्याच पावसात पोलखोल झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक ग्राउंड फ्लोअर मधील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

भाईंदर पश्चिमेत अनेक भाग जलमय

मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसाने मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व तयारीची पोलखोल झाली आहे. भाईंदर पश्चिमेतील अनेक परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी रस्ते जलमय झाले, तर अनेक घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले. यामध्ये माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या निवासस्थानीदेखील गुडघाभर पाणी शिरल्याची घटना घडली. घरातील फर्निचर, कागदपत्रे आणि इतर साहित्य पाण्यात भिजल्याने नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Heavy rain in mumbai since night trans harbour trains are cancelled and heavy traffic on road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Mumbai Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
2

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.