Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन

Mumbai Rain Update: अनेक दिवसांच्या कडाक्याच्या उन्हानंतर अखेर आता मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असून सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2026 | 08:09 AM
Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन

Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन

Follow Us
Follow Us:
  • मुंबई, ठाणे आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
  • वरळी नाका, सायनसह काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
  • हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी करत 24 ते 26 जूनदरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Rain Update: मुंबईतील अनेक भागांमध्ये आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अखेर आता मुंबईत पावसाचे आगमन झाले असून उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जून महिना सुरु झाला तरी देखील पावसाचे आगमन न झाल्याने नागरिक प्रचंड हैराण झाले होते. कारण सतत वाढत जाणारा उकाडा मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरत होता. मुंबई, ठाण्यासह अनेक शहरांतील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करत होते. आता अखेर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे.

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत ‘सी-साईड योग उत्सव’; २ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

शहरातील अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग

मुंबई आणि ठाण्यासह अनेक भागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. दादर, लोअर परळसह वांद्रे परिसर आणि इतर अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तर उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलूंड परिसरात देखील पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड या शहारांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच आजपासून ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंबई आणि ठाण्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सखल भागांंमध्ये पाणी साचण्यास सुरुवात

पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील वरळी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्याच पावसात आता मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सखल भागांत आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन कराव लागत आहे. तसेच सायन परिसरात देखील पाणी साचल्याने सांगितलं जात आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘योग गुरु’!; वरळीत रंगला ‘दिव्याज फाउंडेशन’चा भव्य योगोत्सव

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 22 आणि 23 जून रोजी दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राजवळच्या काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तर, 24 ते 26 जून या काळात मुंबई, उत्तर कोकण आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे.

Web Title: Heavy rain started in mumbai and thane imd issues yellow alert for raigad and thane from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Mumbai Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: लवकरच खरेदी करा रेनकोट अन् छत्री; पाऊस कोकण किनारपट्टीवर थेट…
1

Maharashtra Rain Alert: लवकरच खरेदी करा रेनकोट अन् छत्री; पाऊस कोकण किनारपट्टीवर थेट…

‘अल-निनो’चा वाढता प्रभाव शेतकऱ्यांसाठी धोक्याचा; अपेक्षित पाऊस न झाल्याने दुबार पेरणीची टांगती तलवार
2

‘अल-निनो’चा वाढता प्रभाव शेतकऱ्यांसाठी धोक्याचा; अपेक्षित पाऊस न झाल्याने दुबार पेरणीची टांगती तलवार

महाराष्ट्रात मान्सूनची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस होणार?
3

महाराष्ट्रात मान्सूनची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस होणार?

Rain Update : भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस; अनेक राज्यांना मान्सूनचा मिळणार दिलासा
4

Rain Update : भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस; अनेक राज्यांना मान्सूनचा मिळणार दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.