
In Mumbai North Indian candidate Rekha Yadav emerged win in BMC Election 2026
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २२७ जागांसाठी मतदान झाले असून सध्या मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक निकालांनी अनेक महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये विजयी घोषित केले आहेत. सर्वात चर्चेत असलेले निकाल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग क्रमांक 165 मध्ये महिला उमेदवार रेखा यादव यांचा विजय झाला आहे.
हे देखील वाचा : पुण्यात कॉंग्रेसचे खाते उघडले! पवारांना सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप विजयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे यांचे उमेदवार कप्तान मलिक यांचा वॉर्ड १६५ मधून पराभव झाला आहे. त्यांचा काँग्रेसचे उमेदवार अशरफ आझमी यांनी पराभव केला. नवाब मलिक कुटुंब राजकीयदृष्ट्या प्रभावी असल्याने हा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवाय, मुंबईत शिवसेनेचे तीन उमेदवारांसह सात उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात! रोहित पवारांनी पकडली मोठी चूक
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील काही वॉर्डांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत, ज्यात महिलांचा मोठा सहभाग आणि पक्षांना लवकर मिळालेले यश दिसून आले आहे. यापैकी एक निकाल ऐतिहासिक मानला जातो. मुंबईत विजयी झालेल्या पहिल्या उत्तर भारतीय महिला उमेदवार रेखा यादव यांनी इतिहास रचला आहे. हा विजय उत्तर भारतीय समुदायासाठी देखील महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाने उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर देखील हा विजय झाला आहे.
पहिल्यांदाच भाजपा बीएमसीमध्ये बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. २२७ पैकी १७२ जागांसाठीचे कल समोर आले आहेत, ज्यामध्ये भाजप युती १०८ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. उद्धव-शिवसेना युती ५६ जागांवर आघाडीवर आहे. हे प्राथमिक निकाल आहेत आणि मतमोजणी अजूनही सुरू आहे. एकूणच, महायुती (भाजप-शिवसेना शिंदे गट) आघाडीवर आहे, तर ठाकरे गट (शिवसेना यूबीटी) आणि इतर विरोधी पक्ष मागे आहेत. बीएमसी ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि या निकालांचा थेट परिणाम मुंबईच्या विकास योजनांवर होणार आहे.