Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा जपण्यासाठी उभारले जात आहे, देशातील पहिले पुण्यश्लोक अहिल्याभवन – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

भारतातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामार्फत मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून, सदर भवन उभारण्यात येणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 15, 2024 | 09:54 PM
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा जपण्यासाठी उभारले जात आहे, देशातील पहिले पुण्यश्लोक अहिल्याभवन – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा
Follow Us
Follow Us:

मुंबई उपनगर जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचा भूमिपूजन सोहळा मानखुर्द येथील चिल्ड्रन एड सोसायटी संचालित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात संपन्न झाला. कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामार्फत मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून, सदर भवन उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि भारतातील पहिल्या अहिल्याभवनात मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. हे भवन उभारण्यासाठी ४७ कोटी इतका खर्च अपेक्षित असून, ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणार आहे.

आजच्या या सोहळ्यासाठी विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. या वेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मतिथीचे हे ३०० वे वर्ष आहे. आज फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात त्यांच्या कार्याचा नागरिकांना अभिमान आहे. याचेच औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्ह्यात भारतातील पहिले पुण्यश्लोक अहिल्यदेवी भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. आज आम्ही भूमिपूजन केले आहे आणि येत्या एका वर्षात त्याचे लोकार्पण सुद्धा आम्ही करू. महिला, युवती आणि बालकल्याणासाठी हे भवन एक आदर्श ठरेल. या निर्णयास पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. तसेच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. पुढील वर्षात आपलेच सरकार असेल आणि गरज लागल्यास या प्रकल्पासाठी १०० कोटी सुद्धा देऊन असे स्मारक या ठिकाणी उभारू की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण देशातून लोकं येथे येतील.”

राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे कार्य केले जाणार आहे. येथे संकटात अडकलेल्या, हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक व कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्रांच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या इमारतीत कार्यरत होईल. याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच महिलांना विविध कायदे, योजना व विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी २०० व्यक्तींची क्षमता असलेले अद्ययावत ऑडिटोरियम या संकुलात उभे राहणार आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत हक्काचे विश्रामगृह या संकुलात उभारण्यात येणार आहे. याशिवाय महिला व बालकांच्या विविध विकासात्मक चळवळीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील या विश्रामगृहाचा लाभ घेता येणार आहे.

या अहिल्या भवनाच्या परिसरात मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले खालील कार्यालये असणार आहेत.

१. बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांचे एकूण २० कार्यालये या इमारतीत असतील. सद्यस्थितीत यातील बहुतांश कार्यालये मुंबईत भाड्याच्या इमारतीत आहेत.

२. महिला आयोगाचे मुंबई विभागीय कार्यालय

३. बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचे कार्यालय

४. बालकल्याण समिती : मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेता, या जिल्ह्यात २ बालकल्याण समिती कार्यरत आहेत. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या बाबतीत या समितीला निर्णय घेण्याचे न्यायिक अधिकार असतात. त्यांचे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेली दोन स्वतंत्र कार्यालये या इमारतीत असतील.

५. बाल न्याय मंडळ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांच्या वाढत्या गुन्ह्यांमधील समावेशाचे प्रमाण लक्षात घेता या जिल्ह्यात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या दोन बालन्याय मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या इमारतीत या दोन्ही बालन्याय मंडळांसाठी अद्ययावत सुसज्ज असे कार्यालये असतील.

६. महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे मुंबई जिल्ह्याचे कार्यालय : बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ यशस्वीपणे राबविणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय या इमारतीत असेल.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोरीवली नामकरण

भारताच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या विभूतींची नावे शासकीय औद्योगिक संस्थांना देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला. त्यानुसार बोरीवली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोरीवलीचे प्रमुखस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले.

Web Title: Indias first ahilya bhavan to be built to preserve the legacy of punyashlok ahilya devi holkar cabinet minister mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 09:51 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai Suburban

संबंधित बातम्या

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा
1

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
2

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?
3

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
4

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.