Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?

Mangal Prabhat Lodha: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सहायक प्राध्यापक डॉ. साईगीता चित्तूरू यांनी ‘किशोरावस्था’ या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2026 | 07:13 PM
Drugs Free Mumbai

Drugs Free Mumbai

Follow Us
Follow Us:
  • नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर – मंत्री लोढा 
  • विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रम संपन्न
  • ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाला विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद
मुंबई/Mangal Prabhat Lodha: नशेचे (Drugs) व्यसन शरीरात आणि मनात शिरले, तर त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. कितीही उपचार केले तरी त्याचे परिणाम अनेकदा आयुष्यभर वेदना देऊन जातात. म्हणून नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर आहे, अशी खंत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. त्यामुळे नशेपासून स्वतःला आणि आपल्या पुढील पिढीला दूर ठेवण्यासाठी त्याविरोधात एकत्रितपणे लढणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता गुड टच आणि बॅड टच प्रमाणेच आता ‘गुड फ्रेंड’ आणि ‘बॅड फ्रेंड’ यातील फरक समजून मुलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे आवाहन लोढा यांनी शिक्षक आणि पालकांना केले.

सांताक्रुझ पुर्वेकडील कलिना कॅम्पस् येथील मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे बुधवारी ‘सेवा संकल्प अभियानातंर्गत ड्रग्स फ्री मुंबई – विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानामध्ये शाळा, महाविद्यालय, संस्था व संघटना आणि पोलीस प्रशासन इत्यादींनी उत्तम कामगिरी केली. अशा २१ जणांचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली.

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाची सुरुवात ३० जुलै रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते झाली. हे अभियान वर्षभर सुरू राहणार आहे. नशेद्वारे गुन्हेगारी प्रवृत्ती पण समाजात प्रवेश करत आहे, त्याचा ही धोका ओळखा? आज युद्धाची परिभाषा बदलली आहे. तलवार, बंदुक, बॉम्ब किंवा अणुबॉम्बऐवजी नकली नोटा छापून एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करणे किंवा त्या देशातील युवा पिढीला नशेच्या आहारी लावणे, हीदेखील मोठी आव्हाने आहेत. कारण एखाद्या कुटुंबातील युवक व्यसनाच्या आहारी गेला, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानांतर्गत विद्यार्थी समुपदेशन सत्र आणि शिक्षक प्रशिक्षणाच्या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. या कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी ‘ड्रग्स फ्री मुंबई’ची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात सहाभगी झालेल्या संस्था विविध स्थरावर नशामुक्त युवा पिढी घडविण्यासाठी काम करत आहेत. आजपसून या संस्था एकत्रित प्रयत्नांनातून ड्रग्स फ्री मुंबई अभियानामार्फत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. मुंबईला ड्रग्स फ्री करण्यासाठी आणि आपल्या युवकांना अमली पदार्थांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. आपणही त्यांच्या प्रयत्नांना साथ देऊन आपले योगदान देऊया. आपल्या भावी पिढीच्या रक्षणासाठी एकत्र येऊया आणि मुंबईला ड्रग्स फ्री करूया! #DrugFreeMumbai #नशामुक्तमुंबई #DrugFreeYouth #SocialAwareness #MPLodha — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) October 7, 2026

मुंबईचा विकास होत असताना मुंबईला नशेपासून सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनीही ‘ड्रग्स फ्री भारत’चा संकल्प व्यक्त केला आहे. युवकांच्या शक्तीवरच विकसित भारताची उभारणी होणार आहे. त्यामुळे युवकांनी नशेपासून दूर राहावे आणि ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाला प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केले.

Anti-Narcotics Cell : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई, 1.38 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सहायक प्राध्यापक डॉ. साईगीता चित्तूरू यांनी ‘किशोरावस्था’ या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ब्रम्हकुमारी प्रशांती यांनी ‘Be Smart Be Strong Within’ याविषयावर मुलांना मार्गदर्शन केले. तसेच डिवाईन टच संस्थेच्या प्रतिनिधींनी चांगल्या गोष्टींची योग्य ‘निवड’ कशी करावी, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पोलीस अधिकारी, संस्था व संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Mangal prabhat lodha said drugs and substance abuse is a cancer eating away body and society tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • Drug Free Mumbai
  • Drugs News
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
1

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन
2

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
3

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

मुंबई-एमएमआरची कनेक्टिव्हिटी बदलणार; १० रिंग रोडच्या मास्टर प्लानचे अनावरण, आता प्रवास अधिक सुलभ होणार
4

मुंबई-एमएमआरची कनेक्टिव्हिटी बदलणार; १० रिंग रोडच्या मास्टर प्लानचे अनावरण, आता प्रवास अधिक सुलभ होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.