Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये भव्य दिंडी सोहळा; २१ नोव्हेंबरला विठ्ठल नामाचा गजर

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबईतील दादर येथे २१ नोव्हेंबर रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याचे १६वे वर्ष असून, टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि रिंगण सोहळा हे मुख्य आकर्षण असणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 20, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • कार्तिकी एकादशीनिमित्त २१ नोव्हेंबर २०२६ रोजी दादरमध्ये भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन
  • संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई आणि दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांचा संयुक्त पुढाकार.
  • संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई आणि दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांचा संयुक्त पुढाकार.
     

आषाढी वारीनंतर भाविक कार्तिकी एकादशीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिक महिन्याची सुरुवात झालेली आहे. कार्तिकी एकादशीदरम्यान मंदिर फुलांनी सजवले जाते. रोषणाई केली जाते. भजन, कीर्तन आणि दिंडीचे आयोजन केले जाते. असेच आयोजन यावेळी शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी दादर येथे फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे.

संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशीनिमित्त दादर येथे भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याचे सोळावे वर्ष असून, शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्केट येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे.

मुंबईत नोकरी, व्यवसाय व कामानिमित्त व्यस्त असलेल्या आणि पंढरपूर येथे जाऊन श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, अशा भाविकांना मुंबईतच भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या नामस्मरणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

Dadar Metro Station: मोठी बातमी! दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या चर्चेला नवे वळण; राज्य सरकारचा प्रस्ताव नेमका कोणासाठी?

भाविकांना आवाहन

दादर स्टेशनसमोरील कामत हॉटेल परिसरात होणारा रिंगण सोहळा हे या दिंडीचे विशेष आकर्षण असते. या रिंगण सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. या भवितमय सोहळ्यात सर्व विठ्ठलभक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्तिकी एकादशीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.

गेल्या १५ वर्षांपासून परंपरा उत्साहात सुरू

गेली १५ वर्षे ही परंपरा उत्साहात सुरू असून, यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. दिंडीमध्ये पारंपरिक वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, बॅंड-पथक, विठ्ठल नामाचा जयघोष आणि जागोजागी काढण्यात येणाऱ्या आकर्षक रांगोळ्या हे विशेष आकर्षण असणार आहे.

Thane News: कार्तिकी एकादशीनिमित्त ठाणे शहर विठ्ठलमय; मंदिरांमध्ये आकर्षक सजावट, भजन-कीर्तनाचे आयोजन

दादर फुल मार्केट येथून सुरू होणारी ही दिंडी सेनापती बापट मार्ग, दादर फुल मार्केट परिसर, रेल्वे स्थानक परिसर, कबुतरखाना, एन.सी. केळकर रोड, रानडे रोड मार्गे डी. एल. वैद्य रोडवरील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पोहोचणार असून, तेथे दिंडी सोहळ्याची सांगता होईल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: दादरमध्ये कार्तिकी एकादशीचा दिंडी सोहळा कधी होणार आहे?

    Ans: २१ नोव्हेंबर २०२६ रोजी शनिवारी दादरमध्ये भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

  • Que: दिंडीचा मार्ग कोणता असणार आहे?

    Ans: दिंडी फुल मार्केट, दादर स्टेशन परिसर, कबुतरखाना, एन. सी. केळकर रोड आणि रानडे रोडमार्गे डी. एल. वैद्य रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पोहोचणार आहे.

  • Que: दिंडी सोहळ्यातील मुख्य आकर्षण काय असणार आहे?

    Ans: टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि दादर स्टेशनसमोरील कामत हॉटेलजवळ होणारा रिंगण सोहळा ही प्रमुख आकर्षणे असतील.

Web Title: Kartiki ekadashi dindi sohala dadar mumbai pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • dadar
  • Kartiki Ekadashi
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Dev Uthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशीला राशीनुसार करा हे उपाय; लक्ष्मी-नारायणाची राहील तुमच्यावर सदैव कृपा
1

Dev Uthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशीला राशीनुसार करा हे उपाय; लक्ष्मी-नारायणाची राहील तुमच्यावर सदैव कृपा

Kartiki Ekadashi 2026: जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल..! कार्तिकी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा
2

Kartiki Ekadashi 2026: जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल..! कार्तिकी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

‘राज ठाकरेंचे कार्यकर्ते ‘म्याव म्याव’ करत सुटलेत’; दादर स्थानकाच्या नामांतरावरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
3

‘राज ठाकरेंचे कार्यकर्ते ‘म्याव म्याव’ करत सुटलेत’; दादर स्थानकाच्या नामांतरावरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा

Dadar Metro Station: मोठी बातमी! दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या चर्चेला नवे वळण; राज्य सरकारचा प्रस्ताव नेमका कोणासाठी?
4

Dadar Metro Station: मोठी बातमी! दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या चर्चेला नवे वळण; राज्य सरकारचा प्रस्ताव नेमका कोणासाठी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.