
मोठी बातमी! दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या चर्चेला नवे वळण; राज्य सरकारचा प्रस्ताव नेमका कोणासाठी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैत्यभूमी नामकरणासंदर्भातील प्रस्ताव हा दादर रेल्वे स्थानकाशी संबंधित नसून दादर मेट्रो स्थानकाशी संबंधित आहे. मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असते. त्यामुळे राज्य सरकारकडून याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर नामांतराची अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
या प्रकरणात संभ्रम निर्माण होण्यामागे डीजीआरपीआरने 18 नोव्हेंबर रोजी जारी केलेले प्रसिद्धीपत्रक कारणीभूत ठरले. या प्रसिद्धीपत्रकात दादर रेल्वे स्थानकाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी केले जाणार असल्याचा समज सर्वत्र पसरला. त्यानंतर या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र, आता प्रत्यक्षात दादर रेल्वे स्थानकाऐवजी दादर मेट्रो स्थानकाच्या नामांतराचा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट होत आहे.
दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटातील काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलू नये, अशी भूमिका मांडली होती. तर ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला होता. चैत्यभूमीबद्दल आम्हाला आदर आहे; मात्र दादर या ऐतिहासिक नावाबद्दलही आमच्या मनात आदर आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलू नये, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, आता नामांतराचा प्रस्ताव दादर रेल्वे स्थानकासाठी नसून दादर मेट्रो स्थानकासाठी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या नव्या माहितीवर मनसे आणि ठाकरे गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात, तसेच केंद्र सरकार या प्रस्तावाला मंजुरी देते का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
अल्पवयीन मुलीची दादर रेल्वे स्थानकावरून सुरक्षित सुटका; सोशल मीडियामुळे छत्तीसगडवरून आली अन्…
Ans: नाही. समोर आलेल्या माहितीनुसार दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव नसून दादर मेट्रो स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याचा प्रस्ताव आहे.
Ans: दादर मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. केंद्राच्या मंजुरीनंतर नामांतराची अधिकृत प्रक्रिया पूर्ण होईल.
Ans: मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यास विरोध दर्शवला होता.