Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राज ठाकरेंचे कार्यकर्ते ‘म्याव म्याव’ करत सुटलेत’; दादर स्थानकाच्या नामांतरावरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा

दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ असे नामकरण करण्याच्या मुद्द्यावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करत सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 19, 2026 | 07:59 PM
gunaratna-sadavarte on dadar-railway-station-chaityabhoomi-renaming

gunaratna-sadavarte on dadar-railway-station-chaityabhoomi-renaming

Follow Us
Follow Us:
  • दादर स्थानकाच्या नामांतरावरून तापलं राजकारण
  • ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची राज आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
  • रोहित पवारांवरही साधला निशाणा
Dadar Railway Station Name Change : मुंबई :  दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ असे नामकरण करण्याच्या मुद्द्यावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सदावर्ते यांनी दादर स्थानकाच्या नामांतराच्या निर्णयाचे स्वागत केले. देशभरातील संविधानप्रेमी आणि आंबेडकरी अनुयायांसाठी चैत्यभूमी हे श्रद्धेचे स्थान असून, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वंचितांसाठी प्रकाश देणारे आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत सदावर्ते यांनी विविध समाजघटक बाबासाहेबांचा आदर करतात, असा दावा केला. दादर स्थानकाचे नामांतर करण्याच्या मागणीला मुंबईसह देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले. सदावर्ते म्हणाले, “देशभरातील संविधानप्रेमी आणि आंबेडकरी अनुयायांसाठी दादर येथील चैत्यभूमीला नाव देण्याचा निर्णय अभिमानाची बाब आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.”

पुढे ते म्हणाले, “प्रत्येक कालखंडात विघ्नसंतोषी आणि अडथळे निर्माण करणारे लोक असतात. असे लोक समोर येऊन बोलत नाहीत, तर पडद्यामागून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. राज ठाकरे यांच्यावर मी राजकीय टीका करत आहे. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते सध्या ‘म्याव म्याव’ करत सुटले आहेत. आमदार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संविधानाची शपथ घेतली आहे, याची त्यांनी जाणीव ठेवावी. कपडे धुताना जशी अवस्था होते, तशीच अवस्था करून घ्याल.”

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा

बाळासाहेब ठाकरे यांनी नामांतराला विरोध केला होता, तर शरद पवार यांनीही याच प्रकारचे राजकारण केले होते, असा दावा सदावर्ते यांनी केला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वकल्याणी, मार्गदर्शक आणि वंचितांसाठी प्रकाश देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे. राज ठाकरे यांचे तुमच्या पक्षातील नेमके कोणते सदस्य आहेत? त्यांना लगाम घाला. अन्यथा, तुमची भूमिका संशयास्पद ठरेल. तुमच्यामुळे दादरवासीय किती त्रस्त झाले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंबईसह देशभरातील नागरिक दादर स्टेशनचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याची मागणी करत आहेत. शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता संपुष्टात येईल. संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी विचारपूर्वक भूमिका घ्यावी. तुम्ही सुज्ञ आहात, पक्षात याबाबत चर्चा करा. सुषमा अंधारे ताई कुठे हरवल्या आहेत? या नामांतराला तुमचा विरोध आहे का, याचे उत्तर द्या.”

पिसाळलेल्या कुत्र्यांना मी उत्तर देत नाही – सदावर्ते

पुढे ते म्हणाले, “काँग्रेससोबत असलेल्या लोकांच्या विचारांना कोणीही किंमत देत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आवाहन करतो की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जाऊ नका. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची परंपरा पुढे चालवा. या प्रकरणात कोणतीही गय केली जाणार नाही. रोहित पवार, हे कोणते वर्तन आहे? पिसाळलेल्या कुत्र्यांना मी उत्तर देत नाही. नवनाथ बन साहेब बिगरमराठा आहेत म्हणून त्यांना लोकशाहीत बोलण्याचा अधिकार नाही का?”

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावरही सदावर्ते यांनी टीका केली. रोहित पवार यांच्या भूमिकेमागचे कारण काय, असा सवाल करत त्यांनी या प्रकरणात कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. दादर स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराबाबत गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

    Ans: दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ असे नामकरण करण्याच्या निर्णयाचे सदावर्ते यांनी स्वागत केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

  • Que: सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना काय आवाहन केले?

    Ans: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दादर स्थानकाच्या नामांतराबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडावी आणि बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

  • Que: दादर स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ नामकरण का चर्चेत आहे?

    Ans: दादर येथील चैत्यभूमी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या मुद्द्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Dadar railway station chaityabhoomi renaming gunaratna sadavarte targe thackeray brothers nrpm 08

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Dadar Railway Station
  • Gunratna Sadavarte
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Dadar Station Renaming : दादर स्टेशनच्या नामांतराविरोधात मनसेनंतर ठाकरे गटही मैदानात! आमदार महेश सावंत यांनी मांडली भूमिका
1

Dadar Station Renaming : दादर स्टेशनच्या नामांतराविरोधात मनसेनंतर ठाकरे गटही मैदानात! आमदार महेश सावंत यांनी मांडली भूमिका

Dawood Ibrahim: ‘मुसाफिरखाना’ इमारतीवर महापालिकेचा हातोडा; हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई, परिसरात तणाव!
2

Dawood Ibrahim: ‘मुसाफिरखाना’ इमारतीवर महापालिकेचा हातोडा; हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई, परिसरात तणाव!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा क्षेत्रातील त्रिमूर्तीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांना घरं सोडण्याची वेळ
3

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा क्षेत्रातील त्रिमूर्तीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांना घरं सोडण्याची वेळ

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?
4

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.