५०० कोटी रुपयांच्या दाव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे. भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन ते आपल्याला दिल्याची कुजबूज असल्याचं सांगत, शिंदे साहेबांनी यावर फक्त हो किंवा नाही, असं उत्तर द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली. हा आरोप नसून आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे विचारलेला प्रश्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आपण कालच्या सभेत कोणावरही टीका केली नसून केवळ प्रश्न उपस्थित केला होता, असं जरांगे म्हणाले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मराठा समाजासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.