कुर्ल्यातील BMC च्या शाळा ४ वर्षांपासून बंद, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
कुर्ला येथील प्रभाग क्र. १७१ मधील महानगरपालिकेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी शाळेत हजारो रुपये भरूण प्रवेश घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाकीची असून या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कर्ज काढावं लागत आहे. दागदागिने गहान ठेवावे लागत आहेत. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन बंद पलडेल्या शाळा सुरु करण्याची मागणी, माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी केली आहे.
चुनाभट्टी भागातील हिल रोड येथील शाळा गेले ३ ते ४ वर्षांपासून बंद आहे. तसंच स्वदेशी मिल रोड येथील गोरखनाथ मंडळ येथील शाळेची दोन मजली इमारत तोडण्यात आली आहे. या दोन्ही शाळा महानगरपालिकेच्या आहेत. विद्यार्थ्यांना खासगी शाळेत हजारो रुपये भरुण प्रवेश घेण्यासाठी घरातील नागरिकांचे दागदागिने गहान ठेवून, कर्ज काढून आपल्या मुलांना शिक्षणासाठी आटापीटा करावा लागत आहे. सदर ठिकाणी शिक्षणमंत्र्यांनी लक्ष देऊन बंद शाळा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी, कप्तान मलिक यांनी केली आहे. तसं लेखी निवेदन देण्यात त्यांनी दिलं आहे.