
उरणचे दाम्पत्य अॅनिव्हर्सरीला गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा बंद (फोटो सौजन्य-Gemini)
दुबईहून आपल्या मायदेशी परतीच्या प्रवाससाठी येणाऱ्या नागरिकांवर दुबईमध्ये अडकून रहाण्याची वेळ आली आहे. अशाच परिस्थितीमध्ये कवीश आणि प्रांजली हे दाम्पत्य अडकून राहिले आहे. हे दोघेही सुखरूप त्यांनी सांगितले. मंगळवारी ते आपल्या घरी परत येणार होते. सध्या ते बर दुबई येथील ओमेगा हॉटेल येथे अडकून आहेत.
कवीश आणि प्राजली हे दोघे दुबईमध्ये अडकून असल्यामुळे या दोघांच्या घरातील नातेवाईक विताग्रस्त आहेत. कवीश राहणार जसखार आणि प्राजली राहणार डोंगरी या दोघांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. हे दोघे दुबई येथे अडकले असल्याचे सांगत प्रांजलीचे वडील प्रभाकर घरत यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ठाणे, मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील नागरिकांवरही झाल्याचे समोर आले आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणसेवा विस्कळीत झाली असून, शहापूर तालुक्यातील तब्बल २३ नागरिक परदेशात अडकले आहेत. त्यांचे परतीचे उड्डाण २८ फेब्रुवारी रोजी रात्री १२.४५ वाजता नियोजित होते; मात्र अचानक निर्माण झालेल्या युद्धपरिस्थितीमुळे ही उड्डाणसेवा रद्द करण्यात आली. उड्डाण रद्द झाल्यानंतर हॉटेलचे वाढते बिल, अन्न व इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे.
केशव वैखंडे (७०), कविता वेखंडे (६१), शिवराम वाळिंबे (६३), शुभांगी वाळिंबे (५९), एकनाथ धनके (६७), गुलाब धनके (६२), मधुकर पाटील (७२), मीनाक्षी पाटील (६४), बाळू गायकर (७०), दशरथ हरड (७४), शारदा हरड (६५), किसन मोहपे (७०), मीरा मोहपे (६२), सपना शेलार (६२), करुणा कापरे (५९), अनिता धनके (७१), परशुराम गायकवाड (६१), शुभांगी गायकवाड (५३), रमेश चलपे (६०), लता चलपे (५२), वनिता गायकर (६८), वासुदेव शेलार (७०), तसेच दूर मॅनेजर मनीष सानप (४९) यांचा समावेश आहे. शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी संबंधित कुटुंबीयाची माहिती गोळा करण्यासाठी तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत, स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.