
Harry Boxer Arrested: रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा गँगस्टर हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद!
बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या निवासस्थानाबाहेर १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली होती. हल्लेखोरांनी इमारतीच्या बाहेर अनेक राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेच्या वेळी रोहित शेट्टी स्वतः घरातच उपस्थित होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही दुखापत झाली नव्हती. या गोळीबारानंतर हॅरी बॉक्सरने सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ मेसेजद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत चित्रपटसृष्टीतील कलाकारांना उघडपणे धमक्या दिल्या होत्या.
हॅरी बॉक्सरवर भारतात हत्या, खंडणी उकळणे, धमकावणे आणि गोळीबार यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो अमेरिकेत बसून आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील गुन्हेगारी कारवाया चालवत होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे अमेरिकेच्या ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (ICE) यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्याला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतले.
परदेशात राहून भारतात गुन्हेगारी साम्राज्य चालवणाऱ्या गँगस्टर्सवर भारतीय सुरक्षा यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. हॅरी बॉक्सरच्या आधी गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपूरिया यांनाही अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले होते. अमेरिका आणि युरोपसह इतर देशांच्या सहकार्याने भारतीय तपास यंत्रणा परदेशातील गँगस्टर्सना भारतात आणण्यासाठी वेगाने पावले उचलत आहेत.
Ans: हॅरी बॉक्सर हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कुख्यात गँगस्टर असून त्याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
Ans: १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू येथील घराबाहेर गोळीबार झाला होता.
Ans: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या गुप्त माहितीच्या आधारे अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) यंत्रणेने ही कारवाई केली.