Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास…”; आयुक्त राजेश नार्वेकरांचा कडक कारवाईचा इशारा

अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.  तर या वर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 14, 2025 | 09:55 PM
"अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास..."; आयुक्त राजेश नार्वेकरांचा कडक कारवाईचा इशारा

"अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास..."; आयुक्त राजेश नार्वेकरांचा कडक कारवाईचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत, अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील अनुसूची ४ मधील सूचनांनुसार शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची तयारी, प्रक्रिया, शिजवणे वेगळी असावी. शाकाहारी अन्नपदार्थाची मांसाहारी अन्नपदार्थापासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.

सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षेबाबत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.  तर या वर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापनाना त्वरित नोटीस, कारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी कळविले आहे.

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र आणि भारतीय अन्न व सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नसुरक्षा व प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर विविध प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा व जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनात एकूण नवीन १८९ अन्न सुरक्षा अधिकारी ७ जून २०२५ रोजी रुजू झालेले असल्याने अन्न आस्थापना तपासणी संख्या निश्चितच वाढणार आहे. राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या केल्या जात असून तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

अन्न भेसळीसंदर्भात नागरिकांनीही हेल्पलाइन किंवा Food Safety Connect App च्या माध्यमातून तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपले नजीकचे अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा https://fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही आयुक्त श्री. नार्वेकर यांनी कळविले आहे.

‘रेडी टू ईट’ पदार्थांनी पोखरतंय शरीर

तुम्ही नियमितपणे रेडी टू ईट अन्नपदार्थ किंवा रेडी टू ईट हीट फूड खाता का? तर ही नक्कीच काळजी करण्यासारखी बाब आहे आणि त्याचं कारण म्हणजे अलिकडच्या एका जागतिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न (UPF) खाल्ल्याने अकाली आणि न टाळता येण्याजोगे मृत्यू होण्याचा धोका वाढताना दिसून येत आहे.

रोज तुम्ही मृत्यूला कवटाळताय, ‘रेडी टू ईट’ पदार्थांनी पोखरतंय शरीर; वेळीच व्हा सतर्क

निरोगी वातावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या नियामक आणि राजकोषीय धोरणांद्वारे समर्थित, UPF चा वापर कमी करण्यासाठी जागतिक कृतीची आवश्यकता या अभ्यासातून बळकटी देते. UPF हे अन्नपदार्थांमधून काढलेल्या किंवा प्रयोगशाळेत संश्लेषित केलेल्या घटकांपासून बनवलेले रेडी टू ईट किंवा रेडी टू हीट इंडस्ट्रियल फॉर्म्युलेशन आहेत, ज्यांच्या संरचनेत संपूर्ण अन्न घटक कमी किंवा अजिबात नसतात, याची सामान्य माणसांना कल्पनाच नाहीये.

Web Title: Legal action against food business operators if food safety rules are violated rajesh narvekar mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • food news update
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
1

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार
2

अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार

Mumbai CNG Shortage: वाहतुकीचा बोजवारा! मुंबईत सीएनजी पुरवठा विस्कळीत, वाहनांच्या लांबच लांब रांगा
3

Mumbai CNG Shortage: वाहतुकीचा बोजवारा! मुंबईत सीएनजी पुरवठा विस्कळीत, वाहनांच्या लांबच लांब रांगा

URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई
4

URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.