तुम्हाला माहिती आहे का? आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि आयुष्यावर होत असतो. योग्य आहार घेतल्याने आपण केवळ निरोगी राहत नाही तर आपले आयुर्मान देखील वाढवतो. मात्र काही पदार्थ हळूहळू आपलं आयुष्य कमी करत असतात. अलीकडेच तज्ञांनी अशा 6 खाद्यपदार्थांची ओळख पटवली आहे, ज्यांचे सतत सेवन केल्यास आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात आणि आपले आयुष्य कमी होऊ शकते.
हे 6 खाद्यपदार्थ हळूहळू तुमचे आयुर्मान कमी करत आहेत, डॉक्तरांनी दिलाय इशारा; वेळीच सेवन टाळा
सॉसेज, बेकन, हॉट डॉगसारखे प्रोसेस्ड मीटमध्ये हाय सोडियम आणि प्रिजर्वेटिव्स असतात. यांचे नियमित सेवनाने हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो. डॉक्टरांनी अशा पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे
कोल्ड ड्रिंक्स आणि पॅक्ड ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि यकृताच्या समस्या उद्भवू शकतात. यांचे सतत सेवन केल्याने तुमचे आयुर्मान कमी होऊ शकते
फ्रेंच फ्राईज, समोसे आणि पकोडे यांसारखे तळलेले पदार्थ ट्रान्स फॅट्सने भरलेले असतात. यामुळे वजन तर वाढतेच पण कोलेस्टेरॉलची पातळीही वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो
चिप्स, स्नॅक्स आणि पॅक केलेल्या पदार्थांमध्ये मीठ खूप जास्त असते. जास्त प्रमाणात सोडियम सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि पक्षाघात होऊ शकतो. त्याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात
तसेच पॅक्ड सूप, इन्स्टंट नूडल्स आणि रेडी-टू-ईट पदार्थांमध्ये आर्टिफिशियल चव आणि प्रिजर्वेटिव्स असतात, जे हळूहळू शरीराच्या चयापचय प्रक्रियेस हानी पोहोचवतात
रिफाइंड कार्बोहायड्रेट्सने समृद्ध व्हाईट ब्रेड आणि पास्ता रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवतात. यामुळे शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स आणि लठ्ठपणाच्या समस्या निर्माण करू शकतात