रेडी टू ईट फूड म्हणजे झटपट खाल्ले जाणारे अन्न, जे आधुनिक जीवनशैलीमुळे लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. मात्र, याचे आरोग्यावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. या अन्नामध्ये साखर, मीठ, ट्रान्स फॅट्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्सचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबासारखे आजार निर्माण होऊ शकतात. चला याचे नुकसान जाणून घेऊया.
Ready To Eat Food खाण्याचे आहेत नुकसान (फोटो सौजन्य: iStock)
पोषकतत्त्वांचा अभाव: रेडी टू ईट अन्नामध्ये आवश्यक पोषकतत्त्वांची कमतरता असते. फक्त पोट भरते, पण शरीराला योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे व फायबर मिळत नाहीत.
जास्त प्रमाणात साखर आणि मीठ: या अन्नामध्ये साखर, मीठ व प्रिझर्व्हेटिव्ह्सचे प्रमाण खूप जास्त असते, जे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देते.
ट्रान्स फॅट्स व प्रक्रिया केलेले तेल: या पदार्थांमध्ये हानिकारक ट्रान्स फॅट्स व प्रक्रिया केलेले तेल वापरले जाते, ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते आणि लठ्ठपणासह हृदयाच्या समस्याही होऊ शकतात.
प्रिझर्व्हेटिव्ह्सचे दुष्परिणाम: दीर्घकाळ टिकवण्यासाठी वापरले जाणारे केमिकल प्रिझर्व्हेटिव्ह्स पचन तंत्रावर व किडनीवर वाईट परिणाम करतात.
पचन समस्यांचा त्रास: रेडी टू ईट अन्नाचे वारंवार सेवन केल्याने फायबरची कमतरता होऊन बद्धकोष्ठता, अपचन, आणि पचनासंबंधी आजार निर्माण होऊ शकतात.