local (फोटो सौजन्य- pinterest)
मुंबईकरांना उपनगरीय लोकल, बस, मेट्रोचा तसेच इतर वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास एकाच तिकिटावर करता यावा आणि शहरी प्रवासात सुलभता यावी, यासाठी सिंगल प्लॅटफार्म अॅप विकसित केले आहे. मुंबई वन कार्ड नावाचे हे अॅप येत्या महिन्याभरात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईसह राज्यातील रेल्वे प्रकल्पांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुंबईकरांच्या सेवेत बंद दरवाजाच्या नविन डिझाईनच्या २३८ एसी लोकल दाखल होणार असून राज्यातील रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर रेल्वे मंत्रालयाचा भर असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर 17 जिल्ह्यांमध्ये…
सार्वजनिक वाहतूक प्रणाली सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. या एकच कार्डद्वारे प्रवासी आपल्या प्रवासाचे व्यवस्थितपणे नियोजन करू शकतात. हे कार्ड मुंबईतील प्रवाशांसाठी गेम चेंजर ठरेल आणि संपूर्ण शहरात कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. संपूर्ण मुंबई महानगरात या कार्डवर प्रवास करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वेव्ह समेट, मुंबई जगाच्या नकाशावर
मुंबईत १ ते ४ मे दरम्यान वेव्ह समेट होणार आहे. यात सुमारे १०० देशातील प्रतिनिधी तसेच सुमारे ५ हजार स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात क्रिएटिव्ह प्रॉपर्टी मुंबईत तयार करण्यात येणार आहे. भारतीय सर्व गोष्टी प्राचीन काळापासून आहेत. मालाड मधील २४० एकर जागेत राज्य सरकारसोबत संयुक्तपणे क्रिएटिव्ह उभारणी करण्यात येणार आहे.
गोदिंया-बल्लारशहा दुहेरीकरणामुळे स्थानिकांना
दळणवळणाची चांगली सुविधा मिळणार आहे. यामुळे छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश यांच्यासोबतच व्यापार वाढणार आहे. राज्यातील तब्बल १३२ स्थानकांचा पुर्नविकास एकाचवेळी सुरु आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यात २३ हजार ७०० कोटी रुपये रेल्वेच्या प्रकल्पांकरिता मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून १० दिवसांच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूरचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा सांगणाऱ्या ऐतिहासिक स्थळांना रेल्वेने भेटी देण्याची योजना आहे, असे फडणवीस म्हणाले.