Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

‘लालपरी’ला जिवंत ठेवणाऱ्या ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या थकीत आर्थिक देणी मिळालीच पाहिजेत, या ठाम भूमिकेवर मी कायम ठाम आहे, अशी भूमिका मांडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 23, 2026 | 07:03 PM
"एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी...", परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

"एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी...", परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Follow Us
Follow Us:

राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत धावणाऱ्या ‘लालपरी’ला जिवंत ठेवणाऱ्या ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या थकीत आर्थिक देणी मिळालीच पाहिजेत, या ठाम भूमिकेवर मी कायम ठाम आहे, असे ठासून प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मधील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनवाढीच्या रकमेबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, पहिल्या टप्प्यात शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच मिळेल, त्यामुळे यापुढे प्रत्येक महिन्याच्या वेतनाबरोबर थकीत वेतनवाढीचा हप्ता देणे शक्य होणार आहे. येत्या धुलीवंदनापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत हप्ता देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ते महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट देताना बोलत होते. या कार्यक्रमास आमदार भाई जगताप, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच एसटीचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय हालचालींना वेग, पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’; सत्ता स्थापनेसाठी…

रक्तदानातून सेवेचा संदेश

“रक्तदान शिबिर भरवणे ही सकारात्मक मानसिकतेची साक्ष आहे,” असे सांगत मंत्री सरनाईक यांनी आजवर ३९ वेळा रक्तदान करणाऱ्या श्रीरंग बरगे यांचे कौतुक केले आणि त्यांच्या चाळीसाव्या रक्तदानासाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे नगरपालिकेत नगरसेवक असताना भरवलेल्या पहिल्या रक्तदान शिबिराची आठवण सांगत त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते गोविंदराव आदिक यांच्या सहकार्याची कृतज्ञतापूर्वक नोंद केली.

शिस्त, स्वच्छता आणि जबाबदारीचा धडा

एसटी कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले, “मी शिस्तीबाबत कठोर वाटत असेन, पण स्वच्छतेविषयी माझी भूमिका स्पष्ट आहे.” प्रत्येक बसस्थानकातील प्रसाधनगृहे व स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत, यासाठी ते स्वतः लक्ष घालतात, असे त्यांनी सांगितले. परळ आगार भेटीदरम्यान आढळलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत त्यांनी व्यक्त केलेला रोष पुन्हा अधोरेखित करत, असे प्रकार पुन्हा आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला. “प्रवासी वाहतूक ही केवळ नोकरी नाही, ती सामाजिक जबाबदारी आहे. कर्तव्यभावनेबरोबर सेवाभाव जपला, तरच एसटीची चाके विश्वासाने फिरतील,” असे सांगत प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आश्वासनातून विश्वासाचा प्रवास

थकीत देणी, वेतनवाढीचा हप्ता आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय हे केवळ आर्थिक उपाय नसून, एसटी कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा सन्मान असल्याचे स्पष्ट करत मंत्री सरनाईक यांनी “कर्मचाऱ्यांचा विश्वास आणि जनतेचा आधार हाच एसटीचा खरा भांडवल आहे,” असे ठामपणे नमूद केले. ‘लालपरी’चा प्रवास अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

Web Title: Transport minister pratap sarnaik on i always insist on paying the pending financial dues of st employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
1

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
2

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा
3

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश
4

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.