Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahalaxmi Express Fire : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्याला आग, ट्रेनमध्ये १५०० हून अधिक प्रवासी

Mahalaxmi Express Fire News: मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (क्रमांक १७४१२) ला कोल्हापूर मिरज दरम्यान पंचगंगा नदीनजीक आग लागल्याची घटना घडली.यावेळी प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 14, 2025 | 12:52 PM
कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्याला आग, ट्रेनमध्ये १५०० हून अधिक प्रवासी

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्याला आग, ट्रेनमध्ये १५०० हून अधिक प्रवासी

Follow Us
Follow Us:

Mahalaxmi Express Fire News Marathi : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये एक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र रेल्वेतील प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून रेल्वेतील चैन ओढली आणि रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. हातकलंगले आणि रुकडी दरम्यान पंचगंगा पुलाजवळही ही घटना घडली. अचानक रेल्वेच्या एसी एम २ मध्ये आग लागली आणि आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक १७४१२ हातकणंगले ते रुकडी दरम्यान पंचगंगा पुलाजवळ अचानक आग लागली. ट्रेनमध्ये आग लागताच प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून गाडीची चेन ओढली यानंतर पाहिले असता एसी एम दोन या बोगीच्या चाकाला घर्षणामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले.

 अन्यथा सहा महिन्यात ठाकरे गटाचा अंत…; “ठाकरे गटाच्या नेत्याचा सूचक इशारा

गाडीतील ही आग सिलेंडरने विझवून तात्काळ ही गाडी मिरजेकडे रवाना झाली आणि मिरजे मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एका तासाने ही गाडी मुंबईकडे रवाना झाली.सिलिंडरला आग लागताच, ट्रेन तात्काळ मिरजेकडे रवाना झाली आणि मिरजेतील रेल्वे अधिकाऱ्यांची मदत घेतल्यानंतर, बोगीच्या एका धक्क्याने ट्रेन मुंबईकडे रवाना झाली.

कोल्हापूर स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर वळीवडे स्थानकाच्या काही किलोमीटर आगीची घटना घडल्यावर प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली. प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या आणि सुरक्षित स्थळी जाऊन प्रवासी थांबले. गाडी सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी पुन्हा गाड्यांमध्ये चढून प्रवास केला. या गाडीचे इंजिन नदी शेजारी थांबल्यामुळे अनर्थ ठरला. साखळी ओढल्यानंतर गाडी नदीवर थांबल्यानंतरप्रवाशांनी थेट नदीमध्ये उड्या घेतल्यास आणि मोठी दुर्घटना घडली असती.

१५०० हून अधिक प्रवाशांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी कोल्हापूरातून रात्री ८.३५ च्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस निघते. यामध्ये अनेक आमदार , खासदार , सेलिब्रिटी यांचा समवेश असतो. आज तर चक्क १५०० हून अधिक प्रवाशी ट्रेनमध्ये होते. ट्रेन नेहमीप्रमाणे आपल्या वेळेमध्ये कोल्हापूरवरून निघाल्यानंतर रुकडीच्या जवळ पोहचताच अचानक सर्वच डब्यांमध्ये जळाल्याचा वास येऊ लागला.

तसेच या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रात्री ट्रेनची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही ट्रेन रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात आली. दरम्यान ट्रेनला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

नाना पटोलेंनी नव्या प्रदेशाध्यक्षांचं केलं तोंडभरुन कौतुक; नेमकं काय म्हणाले?

Web Title: Mahalaxmi express fire kolhapur mumbai mahalaxmi express catches fire news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • kolhapur
  • railway

संबंधित बातम्या

Mahalaxmi Express: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या, दोन महिलांचे दागिने लंपास
1

Mahalaxmi Express: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या, दोन महिलांचे दागिने लंपास

Indian Railways: मोठा अपघात टळला! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले मालगाडीचे ७ डबे; बंगळुरू-चेन्नई रेल्वे वाहतूक विस्कळीत
2

Indian Railways: मोठा अपघात टळला! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले मालगाडीचे ७ डबे; बंगळुरू-चेन्नई रेल्वे वाहतूक विस्कळीत

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर; कोरमअभावी सभा तहकूब
3

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर; कोरमअभावी सभा तहकूब

Gokul Chairman Election: कोल्हापुरात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून राजकीय नाट्य सतेज पाटील
4

Gokul Chairman Election: कोल्हापुरात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून राजकीय नाट्य सतेज पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.