
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या, दोन महिलांचे दागिने लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील सालपे स्थानकाजवळ चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या. त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस सुमारे १५ मिनिटे थांबली. प्रवासी गाढ झोपेत असताना रेल्वे थांबल्याची संधी साधून चोरट्यांनी एस-२, एस-३ आणि एस-५ या डब्यांमध्ये प्रवेश केला. खिडक्यांच्या बाजूला बसलेल्या दोन महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाले.
चारित्र्याच्या संशयातून झोपेतच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; वाशिममधील घटनेनं खळबळ
या चोरीच्या घटनेत मुंबईतील रहिवासी सुनिता गोरक्षनाथ तुपे आणि खोपोली येथील सुरेखा खाडे यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या दोन्ही महिला कौटुंबिक कार्यक्रमासाठी कोल्हापूरला जात होत्या. चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ५२ हजार ६०० रुपये असल्याची माहिती आहे. दरम्यान, दागिने चोरी केल्यानंतर चोरट्यांनी रेल्वेवर दगडफेक केल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली आणि पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत सिग्नल व्यवस्था पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणात सिग्नल यंत्रणेच्या तोडफोडीबाबत लोणंद रेल्वे सुरक्षा दलात (RPF), तर दागिने चोरीप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू आहे. सिग्नलच्या वायर नेमक्या कशा कापण्यात आल्या? चोरट्यांनी ही घटना पूर्वनियोजित पद्धतीने घडवली होती का? या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून रेल्वेगाडी थांबवणे आणि त्यानंतर डब्यांमध्ये प्रवेश करून प्रवाशांचे दागिने चोरी करणे, या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः सणासुदीच्या काळात रेल्वेगाड्यांमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वे मार्गावरील सुरक्षा, सिग्नल यंत्रणेचे संरक्षण आणि रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आव्हान आता रेल्वे प्रशासन आणि पोलिसांसमोर आहे.
Ans: सातारा जिल्ह्यातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील सालपे रेल्वे स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.
Ans: मुंबईतील सुनिता गोरक्षनाथ तुपे आणि खोपोलीतील सुरेखा खाडे या दोन महिला प्रवाशांचे एकूण ५२ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले.
Ans: चोरट्यांनी सालपे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस सुमारे १५ मिनिटे थांबली. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रेल्वे डब्यांमध्ये प्रवेश करून दागिने चोरले.