
IAS Transfer Maharashtra, Shweta Singhal Delhi, Minal Karanwal
IAS Transfer Maharashtra: राज्य सरकारने गेल्या शुक्रवारी २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. याला एक आठवडा उलटत नाही तोच राज्य सरकारने प्रशासकीय विभागात आणखी एक मोठा फेरबदल केला आहे. अवघ्या आकाच आठवड्यात पुन्हा अकरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.श्वेता सिंघल यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे, तर गीतांजली बाविस्कर आणि दिलीप जगदाळे यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनपासून मुंबईतील महत्त्वाच्या विभागांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
श्वेता सिंघल: यांची नवी दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’च्या विशेष निवासी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मीनल करणवाल: जळगाव जिल्हा परिषदेच्या CEO पदावरून आता त्यांची मुंबईतील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या संचालकपदी वर्णी लागली आहे.
गीतांजली बाविस्कर: खादी ग्रामोद्योग मंडळाच्या CEO पदावरून आता नियोजन विभागात सहसचिव म्हणून कार्यभार सांभाळतील.
दिलीप जगदाळे: महावितरण (कल्याण) येथून त्यांची बदली जलपुरवठा आणि स्वच्छता विभागात सहसचिवपदी करण्यात आली आहे.
लक्ष्मण राऊत: यांची महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती झाली आहे.
पंकज देवरे: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव पदाची जबाबदारी स्वीकारतील.
नाव आणि सध्याचे पद
राहुल रंजन महिवाल
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे
नवीन नियुक्ती – सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे
रुचेश जयवंशी
नवीन नियुक्ती – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे
कन्हुराज बागटे
नवीन नियुक्ती – व्यवस्थापन
नवीन नियुक्ती – सहसंचालक, महाडिस्कॉम, कल्याण
करिश्मा नायर
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका
नवीन नियुक्ती – मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा परिषद
अमित रंजन
प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केलापूर उपविभाग, यवतमाळ
नवीन नियुक्ती – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका