Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गिरगावकरांना वीजपुरवठा समस्येबाबत दिलासा मिळेपर्यंत…’; Mangal Prbhat Lodha यांचा इशारा

मरीन लाइन्स पुलाजवळील BEST स्टेशन परिसरात ३३,००० वोल्ट वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले असून, ही लाईन रेल्वे रुळाखाली असल्याने दुरुस्ती प्रक्रियेस काही वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2026 | 07:30 PM
‘गिरगावकरांना वीजपुरवठा समस्येबाबत दिलासा मिळेपर्यंत…’; Mangal Prbhat Lodha यांचा इशारा
Follow Us
Follow Us:

नगरसेविका सौ स्नेहल तेंडुलकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा
वीजपुरवठा समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा मंत्री मंगलप्रभात लोढा
BEST स्टेशन परिसरात 33,000 वोल्ट वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास

मुंबई: गिरगाव परिसरात अलीकडे वारंवार होत असलेल्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा यांनी नगरसेविका स्नेहल तेंडुलकर व BEST च्या अधिकाऱ्यांसह प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत त्यांनी तात्काळ दुरुस्तीचे स्पष्ट निर्देश दिले. कामात होणारा विलंब, समन्वयाचा अभाव आणि निष्काळजीपणा याबाबत संबंधितांना कठोर शब्दांत जाब विचारत नागरिकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, काम अर्धवट सोडून निघून गेल्यास स्वतः धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रभाग २१८ मधील नगरसेविका स्नेहल तेंडुलकर यांनी देखील नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची भूमिका मांडली.

मरीन लाइन्स पुलाजवळील BEST स्टेशन परिसरात ३३,००० वोल्ट वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले असून, ही लाईन रेल्वे रुळाखाली असल्याने दुरुस्ती प्रक्रियेस काही वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पर्यायी व्यवस्था म्हणून सध्या विविध ठिकाणांहून ११,००० वोल्ट वीज पुरवठा वळविण्यात आला आहे.

मुंबई होणार ‘ड्रग्ज मुक्त’! सरकार ॲक्शन मोडमध्ये; Mangal Prabhat Lodha यांच्याकडे असणार ‘ही’ जबाबदारी

लोढा यांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी गिरगाव गायवाडी येथे BEST ची विशेष बस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिकांना त्यांच्या समस्या नोंदविणे आणि त्यावर त्वरित कार्यवाही होणे सुलभ होईल. तसेच, दुरुस्तीच्या कामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्नेहल तेंडुलकर यांनी नमूद केले.

याशिवाय, येत्या काही महिन्यांत संपूर्ण गिरगाव परिसरात वीजेच्या वाढत्या मागणीचा आढावा घेण्यासाठी व्यापक सर्वेक्षण करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त सबस्टेशन्स उभारण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, सध्याचे वीज खंडन हे पूर्वनियोजित नसून वाढीव भारामुळे प्रासंगिक स्वरूपाचे असल्याचे BEST प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीदेखील, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना वेळेवर माहिती उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?

सध्या फाटकवाडी येथून फॉल्ट दुरुस्तीच्या गाड्या कार्यरत असून, त्यांचे कार्यक्षेत्र व्यापक असल्यामुळे त्या सर्व ठिकाणी वेळेवर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. याची दखल घेऊन, पुढील साधारण एक आठवड्यात D व C विभागासाठी दुरुस्तीच्या गाड्या ताडदेव BEST विभागातून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच, संबंधित संपर्क क्रमांकही लवकरच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील. गिरगावकरांना दिलासा मिळेपर्यंत या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास मा. लोढा व सौ तेंडुलकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Mangal prabhat lodha continuous follow up regarding eletricity supply issue until residents of girgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • electricity
  • Girgaon
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Tasgaon News: तासगावच्या पालिका शाळा अंधारात; विरोधकांचे ‘भीक मागो’ आंदोलन, सत्ताधाऱ्यांवर शिक्षणाशी खेळल्याचा घणाघात
1

Tasgaon News: तासगावच्या पालिका शाळा अंधारात; विरोधकांचे ‘भीक मागो’ आंदोलन, सत्ताधाऱ्यांवर शिक्षणाशी खेळल्याचा घणाघात

न्यायालयांमधील प्रलंबित खटले कमी होणार; दुर्बल घटकांना कायदेशीर मदतीसाठी ‘या’ कार्यक्रमाचे आयोजन
2

न्यायालयांमधील प्रलंबित खटले कमी होणार; दुर्बल घटकांना कायदेशीर मदतीसाठी ‘या’ कार्यक्रमाचे आयोजन

तरुणांच्या कौशल्य विकासाला मिळणार गती; Mangal Prabhat Lodha यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ
3

तरुणांच्या कौशल्य विकासाला मिळणार गती; Mangal Prabhat Lodha यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ

Thane News : ठाण्यात महावितरणाचा अजब कारभार, घरातील लोक झोपले असताना बसला स्मार्ट मीटर
4

Thane News : ठाण्यात महावितरणाचा अजब कारभार, घरातील लोक झोपले असताना बसला स्मार्ट मीटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.