Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात…”; Mangal Prabhat Lodha यांनी व्यक्त केला विश्वास

चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेंबर (IMC) सभागृहात राज्य नाविन्यता सोसायटी, युनिटी आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गेम डेव्हलपर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात मंत्री लोढा बोलत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2026 | 08:14 PM
“महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात…”; Mangal Prabhat Lodha यांनी व्यक्त केला विश्वास
Follow Us
Close
Follow Us:

डिजिटल गेम डेव्हलपर स्पर्धा युवकांसाठी नवी संधी निर्माण करणारी
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त विश्वास
महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात मोठी भरारी घेणार

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली डिजिटल गेम डेव्हलपर स्पर्धा युवकांसाठी नवी संधी निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. या अभिनव उपक्रमातून महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात मोठी भरारी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेंबर (IMC) सभागृहात राज्य नाविन्यता सोसायटी, युनिटी आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गेम डेव्हलपर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव सौ. मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील; तमिळनाडू कौशल्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. व्ही. विष्णू, गुगल प्लेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. आदित्य स्वामी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, देशाचे माननीय पंतप्रधान  नरेंद्र​ ​मोदी ​ यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेनुसार सर्जनशीलता आणि नावीन्यतेच्या बळावर भारत जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोहोचू शकतो. कौशल्य विकासाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याच धर्तीवर​ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य गेमिंग आणि डिजिटल क्षेत्रात आघाडीचे केंद्र बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

With the rapid pace of global innovation in digital technology, it has become imperative to adapt to the evolving landscape. Over the years, to everyone’s surprise, gaming has emerged from a hobby into a viable career option for youngsters.Under the leadership of Hon. Chief… pic.twitter.com/EsH3meoZbX — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) April 24, 2026

मनीषा वर्मा,​ यांनी आपल्या मनोगतात राज्य शासनाच्या कौशल्य विकास उपक्रमांवर प्रकाश टाकताना सांगितले की, उद्योगस्नेही आणि मानकीकृत प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे युवकांना जागतिक दर्जाच्या कौशल्यांची जोड मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे रोजगारक्षमता वाढण्यासोबतच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे.

डॉ. श्रीकांत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांनी सांगितले की, नाविन्यतेवर आधारित परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे ५,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी ५०० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गेम प्रकल्प सादर केले. या सर्वांचा सन्मान करण्यात आल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला. श्री. व्ही. विष्णू, यांनी उद्योग-आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या मानकांनुसार कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळते आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित होते.

या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि तमिळनाडू येथील सहभागी विद्यार्थ्यांना युनिटीचे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. गेम डिझाइन, डेव्हलपमेंट आणि मोनेटायझेशन या महत्त्वाच्या घटकांवर आधारित प्रशिक्षण या उपक्रमात देण्यात आले.​ कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या गेम्सचे सादरीकरण करण्यात आले, ज्यातून प्रशिक्षणाच्या व्यावहारिक परिणामांचे दर्शन घडले.

Mumbai: ड्रग्ज’ मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक; ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा इशारा

गेमिंग क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे उदयोन्मुख क्षेत्र असून योग्य कौशल्य आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे मंत्री श्री. लोढा यांनी नमूद केले. युवकांनी या संधींचा लाभ घेऊन नाविन्यपूर्ण क्षेत्रात प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Mangal prabhat lodha said maharashtra set take a major leap forward in world class gaming sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • online games
  • Skill Development

संबंधित बातम्या

BGMI Cricket League Event: क्रिकेटप्रेमींसाठी गेमिंगमध्ये धमाका! स्पिन करून जिंका जबरदस्त रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स
1

BGMI Cricket League Event: क्रिकेटप्रेमींसाठी गेमिंगमध्ये धमाका! स्पिन करून जिंका जबरदस्त रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका बंडल्स! नव्या ईव्हेंटमुळे गेममध्ये वाढणार रंगत
2

Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका बंडल्स! नव्या ईव्हेंटमुळे गेममध्ये वाढणार रंगत

“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
3

“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Free Fire Max: AWM ते Groza पर्यंत… या आहेत गेममधील सर्वात लोकप्रिय बंदूकी! असा करा योग्य वापर आणि जिंका मॅच
4

Free Fire Max: AWM ते Groza पर्यंत… या आहेत गेममधील सर्वात लोकप्रिय बंदूकी! असा करा योग्य वापर आणि जिंका मॅच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.