
मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांकडून चोप,नेमकं काय घडलं?
Marathi language Controversy in Marathi : मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का? हे बघा नसेल तर त्यांना करायला लावा, असं आदेश राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांनी बँकेतील व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत असे सांगितल्यावर मनसे अलर्ट मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. ठाण्यात, मनसे कार्यकर्ते बँकांमध्ये निदर्शने करत आहेत आणि बँकांमधील सर्व व्यवहार मराठीत अनिवार्य करण्याची मागणी करत आहेत. याचदरम्यान “मराठी गया तेल लगाने, असे म्हणणाऱ्या मुजोर सुरक्षा रक्षकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला आहे.
पवईतील एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची एका मराठी व्यक्तीसोबत काही कारणामुळे वाद झाला होता. यातून दोघांमध्ये वाद झाला. सुरक्षा रक्षक उत्तरेकडील असल्याने त्याला मराठी येत नव्हते. याशिवाय जर मराठी भाषा येत नसल्याचे छातीठोकपणे तो सुरक्षा रक्षक सांगत होता. मराठी गया गया तेल लगाने, असे देखील या सुरक्षा रक्षकाने म्हटले आहे. या सुरक्षा रक्षकला मनसैनिकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
मराठीचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही..
मनसैनिकांनी त्या सुरक्षा रक्षकाला चांगलीच समज दिली. आधी त्याला कानाखाली लगावली आणि मराठीचा अपमान केल्याबद्द संताप व्यक्त केला. पवई येथील एल अँड टी येथे, ‘मराठी गेला तेल लगाने’ असे म्हणणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावण्यात आली. मराठी येत नसेल तर शिकायला हवं आणि हे शांतपणे बोलायला हवं. ‘मराठी गया तेल लगाने’ असं म्हणत मराठी भाषेचा अपमान करणं योग्य नसल्याचं मनसैनिकांनी यावेळी सांगितलं. मराठी येत नसेल तर ती भाषा शिका. मात्र त्याचा अवमान करणाऱ्याला सोडणार नाही, असंही मनसैनिकांनी म्हटले आहे.
दरम्यान, ठाण्यातील मनसे कार्यकर्ते बँकांमध्ये निदर्शने करत आहेत आणि बँकांमधील सर्व व्यवहार मराठीत अनिवार्य करण्याची मागणी करत आहेत. या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, आज बँकेला निवेदन देत ताकीद दिली आहे, सर्व बोर्ड मराठीत असले पाहिजे. स्टाफ देखील मराठी माणसं पाहिजेत. बोलणारी माणसे देखील मराठीच असली पाहिजेत. बदल दिसला नाही तर मनसेला सामोरे जावे लागणार आहे. तसेच आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो. मात्र, आज काही बँका बंद आहेत, उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खाजगी बँकांना निवेदन देणार आहे. मराठीत कारभार झाला नाही तर बँकेत सर्व बॅनर्स आम्ही स्वखर्चाने लावणार आहोत. मराठी व्यवहार झाला नाही आणि बॅनर जर लावले नाही तर फुकट मार खाल. मराठी माणसाबाबत मराठीचा खरंच अपमान होत असेल तर आमची लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील. पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकात आमचे निवेदन जाणार आहे. आम्हाला बदल हवाय, असे त्यांनी यावेळी म्हटले.