
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना! टर्मिनल 1 वरील सीटिंग एरियामध्ये लागली भीषण आग (Photo Credit- X)
मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग टर्मिनलच्या आतील केबल ट्रे आणि स्विच बॉक्समध्ये लागली होती. आगीचे स्वरूप पाहता ही आग केवळ टर्मिनलच्या तळमजल्यापर्यंतच मर्यादित होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.
Mumbai – A fire broke out at Terminal 1 of Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Vile Parle this evening. The incident occurred around 6:00 PM. According to preliminary information, the fire is suspected to have been caused by a short circuit. pic.twitter.com/AqfMwRjPrl — NextMinute News (@nextminutenews7) April 9, 2026
Mumbai Fire News: मुंबईच्या दहिसरमध्ये २४ मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
विमानतळाच्या टर्मिनल 1 मधून काळपट धुराचे लोट बाहेर येत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क करण्यात आली. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी लागलेली ही आग आता पूर्णपणे विझवण्यात आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असला तरी प्रशासनाकडून सविस्तर तपास सुरू आहे. विमानतळावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही काळ संबंधित भागातील वाहतूक आणि प्रवेश मर्यादित करण्यात आला होता. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून विमानतळाचे कामकाज हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
यापूर्वी, ७ एप्रिल रोजी मुंबईतील माटुंगा परिसरात असलेल्या रेल्वे कारशेडमध्ये अचानक आग लागल्याने, त्या भागात एकच गोंधळ आणि घबराट उडाली होती. ही घटना मध्य रेल्वेच्या ‘कोच दुरुस्ती कार शेडमध्ये’ घडली जी माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ स्थित आहे आणि जिथे रेल्वेच्या डब्यांची दुरुस्ती व देखभाल केली जाते. प्राप्त माहितीनुसार, कारशेड आवारात उभा असलेल्या एका डब्यातून या आगीची सुरुवात झाली; काही क्षणातच आगीच्या ज्वाळा वेगाने भडकल्या आणि त्यातून दाट धूर बाहेर पडू लागला, जो मोठ्या परिसरात पसरला. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या (फायर टेंडर्स) घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले.
Mumbai Fire : मुंबईतील माहीममध्ये अग्नितांडव! दोघांचा होरपळून मृत्यू