Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “कोस्टल रोड परिसरातील मोकळ्या जागेवर…”; मंगलप्रभात लोढांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्वाची मागणी

कोस्टल रोडमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्येही अभूतपूर्व वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी मंजुरी मिळवताना पर्यावरणीय नियमांनुसार जवळपास २०० एकर जागा खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2025 | 07:38 PM
Devendra Fadnavis: “कोस्टल रोड परिसरातील मोकळ्या जागेवर…”; मंगलप्रभात लोढांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्वाची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, मुंबईतील कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदाने विकसित करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री माननीय  देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोस्टल रोडमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्येही अभूतपूर्व वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी मंजुरी मिळवताना पर्यावरणीय नियमांनुसार जवळपास २०० एकर जागा खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, त्या जागेपैकी ५० एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या पत्राद्वारे केली आहे.

मोकळ्या जागेच्या योग्य उपयोगासाठी आणि युवकांना खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फुटबॉलचे मैदान, क्रिकेटचे मैदान, रनिंग ट्रॅक तसेच कबड्डी सारख्या पारंपरिक खेळांसाठी मैदान उभारण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच, उर्वरित १५० एकर जागेवर भव्य उद्यान आणि वृक्षारोपण करण्यात यावे, यावरही त्यांनी भर दिला आहे.

पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबईत भविष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा उपलब्ध होईल की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे या संधीचा उपयोग करून विविध खेळाची मैदाने निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यास युवा पिढीला खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील आणि मुंबईकरांसाठी देखील एक महत्त्वाचा प्रकल्प साकारला जाईल. या प्रस्तावाची तातडीने दखल घेऊन आवश्यक सरकारी परवानग्या व प्रक्रियांच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढांना 36 वर्षांनी दिलासा

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयात सुरु असलेल्या ३६ वर्षे जुन्या खुटल्यातून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. रामजन्मभूमी आंदोलनाच्या दरम्यान ग्रांट रोड रेल्वे स्थानका दरम्यान करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनासाठी त्यांच्याविरोधात खटला सुरु होता. अखेर बुधवारी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा: Mangal Prabhat Lodha: मंत्री मंगलप्रभात लोढांना 36 वर्षांनी दिलासा; रामजन्मभूमी आंदोलनाच्या खटल्यातून निर्दोष सुटका

१९८९ सालच्या रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान भाजपाचे सध्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे तात्कालीन विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते. या आंदोलना दरम्यान लोढा यांच्या नेतृत्वाखाली ग्रांट रोड स्थानकावर रेल रोको आंदोलन झाले होते. तब्बल ३६ वर्षे हा खटला सुरू राहिला. रामजन्मभूमी आंदोलनात हिंदूंच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी आणि रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी संपूर्ण देशभर अनेक भागांत विविध ठिकाणी वेगवेगळे खटले दाखल झाले होते. त्यातील हा एक खटला होता.

 

Web Title: Minister mangal prabhat lodha demand to cm devendra fadnavis coastal road area free space convert to sports ground marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 07:38 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Mangalprabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
2

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
3

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा
4

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.