मुंबई : मुंबै बँक प्रकरणात 10 ते 12 तास दरोडेखोर असल्यासारखी चौकशी सुरू झाली आहे चौकशी अधिकारी त्याठिकाणी जाऊन चौकशी करत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त पदावर नेमणूक केल्यानंतर नव्या सीपींकडे टास्क दिली आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. त्यांना नेमकी काय टास्क दिली आहे असाही सवाल त्यांनी केला(Mumbai Bank scam: Inquiry into my being a robber; Praveen Darekar’s claim).
राज्याच्या गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस बदली प्रकरणातील चौकशीवर भूमिका मांडली. त्यानंतर सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मुंबई पोलीस आयुक्तांकडे कोणाविरुद्ध एफआयआर दाखल करायचा आहे याची यादी जाहीर झाल्याचे सांगितले. त्यामध्ये प्रवीण दरेकर यांचा पहिला क्रमांक असल्याचेही ते म्हणाले. याच यादीवर दरेकर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कुठल्याही बँकेचा निर्णय एक व्यक्ती घेत नसतो. त्याठिकाणी संचालक मंडळ निर्णय घेत असते. उत्तम कारभार असल्याने बँक प्रशासनाकडून चौकशीला सहकार्य केले जात आहे. चूक केली असेल तर चिंता करावी लागेल, पण आम्हाला घाबरण्याचे कारण नाही. कोर्टाची सी समरी झालेली असतानाही पुन्हा चौकशी करत 15 वर्षे जुना विषय काढला.
नरेंद्र दाभाडे बोलत असताना एक मुद्दा लक्षात आणला की, सरकारचा कॅबिनेट मंत्री हा अर्थसंकल्प चर्चेला गैरहजर आहे. त्यामुळे कामकाज 5 मिनिटांसाठी स्थगित करावे, अशी भूमिका आम्ही घेतली. मविआ सरकार निर्ढावलेले सरकार आहे. चर्चेला कॅबिनेट मंत्री उपस्थित नव्हता. कॅबिनेट मंत्र्यांना जनतेच्या भावनांची काय कदर आहे? असाही सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]