
ठाकरेंचा २५ वर्षांचा गड ढासळला? मुंबईचा महापौर २६ जानेवारीनंतरच निवडला जाणार; काय आहे कारण? (Photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या रात्री स्वित्झर्लंडमधील दावोस गुंतवणूक परिषदेसाठी रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री २५ जानेवारीला भारतात परतणार असल्याने, महापौर निवडीची अधिकृत प्रक्रिया आणि त्याबाबतची राजकीय रणनीती २६ जानेवारीनंतरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मुंबईत महापौरांची निवड थेट जनतेतून होत नाही, तर ती एका कायदेशीर प्रक्रियेद्वारे पार पडते. महापालिका निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक आपापल्या पक्षाचा उमेदवार निश्चित करतात आणि मतदान करतात. तसेच, मुंबई महानगरपालिका आयुक्त महापौर निवडीची अधिकृत तारीख आणि प्रक्रिया जाहीर करतात. महापौरपदाची श्रेणी (खुला प्रवर्ग, महिला, ओबीसी किंवा एससी/एसटी) निश्चित करण्यासाठी सोडत काढली जाते. तसेच मुंबई महापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो.
मुंबईचा महापौर हा शहराचा “प्रथम नागरिक” मानला जातो.
अध्यक्षपद: महापौर महापालिका सभागृहाच्या सर्व बैठकांचे अध्यक्षपद भूषवतात.
प्रतिनिधित्व: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी महापौरांवर असते.
मानधन: महापौरांना पगार नसून दरमहा मानधन दिले जाते, तसेच निवासस्थान आणि इतर शासकीय सुविधा पुरवल्या जातात.
गेल्या अडीच दशकांपासून बीएमसीवर शिवसेनेची (ठाकरे गट) सत्ता होती. मात्र, २०२६ च्या निकालांनी मुंबईच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. सर्वाधिक नगरसेवक असलेला पक्ष म्हणून भाजप आता आपल्या हक्काचा महापौर बसवण्यासाठी सज्ज झाला आहे.