Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Chhath Puja : मुंबईत छठपूजेसाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन! परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’, भाविकांना मिळणार सुविधा

Mumbai Chhath Puja : मुंबईत छठपूजेसाठी महापालिकेकडून विशेष नियोजन करण्यात येणार आहे. परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, कृत्रिम तलाव, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही आणि विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्याचे आश्वासन आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 29, 2026 | 06:30 PM
Mumbai Chhath Puja : मुंबईत छठपूजेसाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन! परवानग्यांसाठी 'एक खिडकी योजना', भाविकांना मिळणार सुविधा

Mumbai Chhath Puja : मुंबईत छठपूजेसाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन! परवानग्यांसाठी 'एक खिडकी योजना', भाविकांना मिळणार सुविधा

Follow Us
Follow Us:
  • आयुक्त अश्विनी भिडे यांच्या बैठकीत चर्चा
  • भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे लोढा यांचे आवाहन
  • कृत्रिम तलाव, विद्युत रोषणाईची व्यवस्था करणार
मुंबई शहर आणि उपनगरांत छठपूजेचा उत्सव (Mumbai Chhath Puja) यंदाही उत्साहात आणि सुरळीत पार पडावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) विशेष नियोजन करावे, यासाठी छठपूजेदरम्यान भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला 20 हून अधिक छठपूजा समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी विविध सूचना आणि मागण्या मांडल्या. त्यानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

जुहू चौपाटीवर पाच लाख भाविकांची गर्दी

मुंबईतील मढ-मार्वे, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि बाणगंगा यांसारख्या ठिकाणी छठपूजेसाठी मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात. विशेषतः जुहू चौपाटीवर सुमारे पाच लाख भाविक छठपूजेसाठी उपस्थित राहत असल्याने तेथे पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. सार्वजनिक स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या, पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यावर समित्यांच्या प्रतिनिधींनी भर दिला.

Mumbai Heritage Conservation : मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला नवी झळाळी! शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे, वरळी किल्ल्याचेही संवर्धन

कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याच्या सूचना

मुंबईतील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार कृत्रिम तलावांची निर्मिती करावी, छठपूजेच्या काही दिवस आधी सर्व चौपाट्यांची स्वच्छता करावी आणि गिरगाव चौपाटीवर पूजा-अर्चनेसाठी व्यासपीठ उभारावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. छठपूजेसाठी आवश्यक साहित्य आणि इतर सुविधा महापालिकेने उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही प्रतिनिधींनी व्यक्त केली.

छठपूजेच्या आयोजनासाठी परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना राबविण्याबाबत सूचना दिल्या जातील. तसेच प्रत्येक ठिकाणी समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. आवश्यकतेनुसार अधिक कृत्रिम तलाव उभारण्यासह अग्निशमन दलाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही यंत्रणा, विद्युत रोषणाई, फिरती स्वच्छतागृहे आणि कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन महापालिकेने दिले.

Tiger Shroff Firing Case Update: सुरक्षा रक्षकांशिवाय फुटबॉल खेळत होता टायगर! शूटर अगदी जवळ, तरीही का नाही झाला हल्ला?

मुंबई महानगरपालिका इतर सणांच्या वेळी ज्या पद्धतीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देते, त्याच धर्तीवर छठपूजेसाठीही व्यवस्था करण्यात येईल. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

याप्रसंगी, भाजप मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, नगरसेवक बाळा तावडे, महापालिका अधिकारी आणि समित्यांचे प्रतिनिधी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

छठपूजा स्थळांवर भाविकांची गैरसोय टाळा – मंगलप्रभात लोढा

छठपूजा हा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा उत्सव आहे. मुंबई महानगरपालिकेने छठपूजा स्थळांवर कृत्रिम तलाव, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. तसेच, एक खिडकी योजनेद्वारे परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करून भाविकांची गैरसोय टाळावी. मुंबईची सर्वसमावेशक संस्कृती जपत छठपूजा उत्सव सुरक्षित आणि उत्साहात नक्कीच पार पडेल असेही लोढा यावेळी म्हणाले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईत छठपूजेसाठी कोणत्या विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत?

    Ans: छठपूजेसाठी कृत्रिम तलाव, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी खोल्या, विद्युत रोषणाई आणि सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

  • Que: छठपूजेच्या परवानग्यांसाठी कोणती योजना राबवण्यात येणार आहे?

    Ans: परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये ‘एक खिडकी योजना’ राबवण्याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.

  • Que: मुंबईत छठपूजा कुठे आयोजित केली जाते?

    Ans: मढ-मार्वे, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि बाणगंगा यांसारख्या ठिकाणी छठपूजेसाठी भाविक मोठ्या संख्येने एकत्र येतात.

Web Title: Mumbai chhath puja single window scheme facilities bmc rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Ashwini Bhide
  • Girgaon
  • Mangalprabhat Lodha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.