Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भक्तीला जनजागृतीची जोड! गणेश दर्शनासोबत योजनांची माहिती! ‘लोकसंवाद २०२६’मधून नागरिकांना थेट मार्गदर्शन

Mumbai Ganeshotsav 2026 Lok Samvad: मुंबई उपनगरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गणेश मंडपांचे रूपांतर लोककल्याणकारी योजनांच्या माहितीच्या व्यासपीठात करण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 23, 2026 | 05:39 PM
Lok Samvad 2026,

Lok Samvad 2026,

Follow Us
Follow Us:
  • गणेश मंडप बनले सरकारी योजनांचे माहिती केंद्र
  • ‘लोकसंवाद २०२६’ला मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद
  • ‘लोकसंवाद २०२६’चा अभिनव उपक्रम
मुंबई: गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा सुंदर संगम साधत माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद २०२६’ या अभिनव उपक्रमाला मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेश मंडळांना भेट देण्यासाठी परिसरातील नागरिकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन गणेश मंडपांचे रूपांतर लोककल्याणकारी योजनांच्या माहितीच्या व्यासपीठात करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश दर्शनासोबतच नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे.

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

या उपक्रमात केवळ योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, योजनेसाठी पात्रता काय, अर्ज कुठे व कसा करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, संबंधित शासकीय कार्यालय कोणते आणि उपलब्ध सुविधांचा लाभ कसा घ्यायचा, याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शासकीय योजना आणि नागरिक यांच्यातील माहितीची दरी कमी करण्यास मदत होत आहे.

युवक, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सेवा-सुविधांची माहितीही यावेळी देण्यात आली. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन करून उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

नागरिकांशी थेट संवाद

‘लोकसंवाद २०२६’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत सोबत समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि महसूल विभागाने समन्वयाने सहभाग घेतला. विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आणि संजय ओरके यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत उपक्रमाचे समन्वयन केले.

यावेळी ग्राम महसूल अधिकारी घोषिता गोसावी, समाजकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी नंदना गजभिये, तालुका समन्वयक आनंदा कांबळे, समतादूत सिद्धार्थ शिरसाट तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक परेश अपंडकर यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्या सहकार्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवातील लोकसहभागाचा सकारात्मक उपयोग करून शासनाच्या योजना, सेवा आणि सुविधांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

गणेश मंडळांचाही उत्स्फूर्त सहभाग

‘लोकसंवाद २०२६’मध्ये सहभागी झालेल्या मंडळांमध्ये इंदिरानगरचा राजा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आशापुरा, वांद्रे पूर्व याचे अध्यक्ष अरुण देवेंद्र, खजिनदार मंगेश कोणार आणि सचिव विनय कडतल; शास्त्रीनगरचा राजा शास्त्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शास्त्रीनगर, वांद्रे पूर्व याचे अध्यक्ष संतोष गाडे, खजिनदार सुदर्शन कोंडा आणि सचिव बाबू वेमुला; तसेच सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व यांचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष निलेश जाधव, सरचिटणीस एकनाथ जाधव, खजिनदार दशरथ नाईक आणि सहखजिनदार रत्ना नाईक यांनी सहभाग नोंदविला.गणेशोत्सवातील भक्तीच्या वातावरणाला लोककल्याणकारी योजनांच्या जनजागृतीची जोड देत ‘लोकसंवाद २०२६ ने गणेश मंडपांना संवाद, माहिती आणि मार्गदर्शनाची केंद्रे बनविले आहे.

मोठी बातमी ! रस्त्यांवर फटाके फोडण्यास आता बंदी; डीजे, लेझर बीमलाही विरोध

Web Title: Mumbai ganeshotsav 2026 lok samvad government schemes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Government Schemes
  • Mumbai Ganesh Festival

संबंधित बातम्या

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
1

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर
2

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
3

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

Ganpati Visarjan: बाप्पाच्या विसर्जनानंतर या गोष्टींचे करा दान, ग्रहदोषांपासून मिळेल दिलासा
4

Ganpati Visarjan: बाप्पाच्या विसर्जनानंतर या गोष्टींचे करा दान, ग्रहदोषांपासून मिळेल दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.