Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalbaug Raja: १८ वर्षांची श्रद्धा, भक्तीचा उत्सव! बिग एफएम आणि ‘लालबागचा राजा’ यांची अनोखी परंपरा कायम

Lalbaug Raja: लालबाग येथून बिग एफएमच्या लाइव्ह स्टुडिओचे स्थानांतर हे या वर्षीच्या क्रियाशीलतेच्या केंद्रस्थानी होते. त्यामुळे हे केंद्र लोकांच्या अधिक जवळ आले आणि महोत्सवाला आकार देणारे क्षण टिपण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 12, 2026 | 07:35 PM
लालबागचा राजा

लालबागचा राजा

Follow Us
Follow Us:
  • बिग एफएमकडून ‘लालबागचा राजा’शी सहयोगाची १८ वर्षे साजरी
  • लाईव्ह स्टुडिओ बूथद्वारे महोत्सव आणला भाविकांच्या अधिक निकट
  • बिग एफएमच्या ‘लालबागचा राजा’ मोहिमेला त्याच्या गतिशीलतेची जोड
मुंबई/Lalbaug Raja: ‘लालबागच्या राजा‘सोबतच्या सहयोगाला १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिग एफएमने दीर्घकाळ सुरू असलेल्या त्याच्या गणेशोत्सवाच्या आणखी एका आवृत्तीचा समारोप केला आहे. या एफएम केंद्राने प्रत्यक्ष ठिकाणाहून थेट प्रक्षेपण, अस्सल कथाकथन आणि डिजिटल एगेंजमेंटच्या माध्यमातून त्याचा नियमित स्टुडियो उत्सवाच्या केंद्रभागी आणला. या वर्षीच्या उत्सवाला उबेरने पाठबळ देऊन बिग एफएमच्या ‘लालबागचा राजा’ मोहिमेला त्याच्या गतिशीलतेची जोड दिली. उबेर  आणि सिट्रोएन ही ड्रायव्हिंग पार्टनर म्हणून समाविष्ट झाली, तिने ऑन-ग्राउंड अनुभवाला आराम-केंद्रित घटकाची जोड दिली.

या १० दिवसांच्या उत्सवात उबेरने तिच्या सर्व मोबिलिटी फ्लीटमध्ये वापरकर्त्यांसाठी प्रथमच पहिली राईड मोफत हा उपक्रम राबविला. तसेच या सहयोगातून १० विजेत्यांना लालबागचा राजाच्या विशेष व्हीआयपी दर्शनाची संधीही मिळाली. या उपक्रमाला बिग एफएमचे रेडिओ आणि सोशल प्लॅटफॉर्म तसेच उबरच्या ऑन-ग्राउंड उपस्थितीतून पाठबळ देण्यात आले. यामध्ये ब्रँडेड टचपॉइंट्स आणि दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांसाठी वेटिंग लाउंजचा समावेश आहे. सिट्रोएनच्या ऑन-ग्राउंड उपस्थितीमध्ये कार शोकेस आणि मसाज चेअर्ससह समर्पित कम्फर्ट झोन होते. त्यामुळे भाविकांना दर्शनानंतर विश्रांती घेण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली.

गुजरातचा तराफा आणला अन् लालबाग राजाचं विसर्जन खोळंबलं…; लालबाग राजा मंडळ कोळी बांधवांना खेचणार कोर्टात

लालबाग येथून बिग एफएमच्या लाइव्ह स्टुडिओचे स्थानांतर हे या वर्षीच्या क्रियाशीलतेच्या केंद्रस्थानी होते. त्यामुळे हे केंद्र लोकांच्या अधिक जवळ आले आणि महोत्सवाला आकार देणारे क्षण टिपण्यात आले. या स्टुडिओमध्ये थेट आरती कव्हरेज, मूर्तीचे अनावरण, सेलिब्रिटी आणि भक्तांशी संभाषणे, उत्सवाचे अपडेट्स आणि विसर्जन कव्हरेज ही विशेष आकर्षणे होती. तर लालबागला प्रवास करू न शकणाऱ्यांपर्यंत हा अनुभव बिग एफएमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मने पोहोचविला.

करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, प्रकाश जोग, विशाल-शेखर जोडीतील शेखर रावजियानी, ‘हनुमान अंश’ची संगीत टीम आणि अशा अनेक सेलिब्रिटींनी बिग एफएमच्या स्टुडिओला भेट दिली; त्यांनी बाप्पाशी संबंधित आपल्या उत्सवातील आठवणी आणि अनुभव येथे शेअर केले.

लालबागच्या राजाच्या मूर्तीकरांच्या कथेचा शोध घेणारी ‘मूर्ती मेकर ऑफ लालबाग’ ही रेडिओ माहितीपट मालिका या वर्षीच्या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग ठरली. संभाषणे, आसमंतातील आवाज आणि वास्तविक कथांद्वारे या मालिकेने पिढ्यान् पिढ्या मुंबईच्या उत्सवाचे केंद्र बनलेल्या मूर्तीमागील कारागिरी आणि भक्तीवर दृष्टी टाकली. यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये ‘ हुमन्स ऑफ लालबाग’चाही समावेश होता. यात भक्त, स्वयंसेवक, विक्रेते आणि कुटुंबांकडे मायक्रोफोन वळवून लालबागच्या राजाला एकत्रितपणे इतका सखोल वैयक्तिक उत्सव बनविणारे व्यक्तिगत अनुभव टिपण्यात आले.

‘नवासाला पावणारा गणपती’ अशी ओळख असलेला लालबागचा राजा राजेशाही थाटात विराजमान, पहा पहिली झलक

रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेडचे सीईओ अशित कुकियन म्हणाले म्हणाले, यावर्षी आम्हाला केवळ दृश्यांच्या पलीकडे जाऊन उत्सवाचा आत्मा असणाऱ्या कहाण्या मांडायच्या होत्या – मूर्ती बनविणारे लोक, दरवर्षी येणारे भाविक, कुटुंबाच्या आठवणी आणि बदलत्या मुंबईतही स्थान टिकवून असणाऱ्या परंपरा सांगायच्या होत्या. यातच रेडिओची एक अनोखी भूमिका असते, यावर आमचा विश्वास आहे.”

हे १८ वे वर्ष संपत आले असताना ‘लालबागचा राजा’शी बिग एफएमच्या सहकार्यातून या उत्सवाला ओळख पुरवणाऱ्या कथा, आवाज आणि भावनांसाठी एक स्थान तयार होत आहे. त्यातून ‘लालबागचा राजा’चा मूळ रेडिओ भागीदार म्हणून सुमारे दोन दशकांत तयार झालेले नाते अधिक घट्ट होत आहे

Web Title: Mumbai lalbaug raja and big fm 18 years completed tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • lalbagcha raja
  • Lalbaug Raja

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.